मुंबई: सध्या मीडिया मध्ये उर्वशी रौतेला (urvashi rautela) आणि ऋषभ पंतची (Rishabh Pant) जोरदार चर्चा आहे. कारण सोशल मीडियावर दोघांमध्ये भांडण सुरु आहे. उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत RP चं नाव घेतलं आणि तिथूनच या सर्व वादाला सुरुवात झाली. रविवारी पुन्हा एकदा दोघे चर्चेत आले आहेत. त्यामागे कारण सुद्धा तस खासच आहे. आशिया कप 2022 भारत-पाकिस्तान सामन्याशी संबंधित हा विषय आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान मध्ये सामना सुरु आहे. ही मॅच पाहण्यासाठी उर्वशी पोहोचली. लगेचच याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
ही मॅच पहायला उर्वशी रौतेला स्टेडियम मध्ये आली. पण या मॅच मध्ये पंतच खेळत नाहीय. कॅप्टन रोहित शर्माने त्याच्याजागी अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकला संधी दिली. ऋषभ पंतला या सामन्यातून वगळणं चर्चेचा विषय बनलेला असतानाच आता उर्वशी तिथे दाखल झाल्याने बिचारा पंत आणखी अडचणचीत आला आहे.
Reason why #RishabhPant is not playing today.#IndiaVsPakistan #RishabhPant #INDvPAK #UrvashiRautela #vpathak pic.twitter.com/4DDg1o74SK
— Vamaneshwar Pathak Shubham (@vamaneshwar) August 28, 2022
काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत मध्ये सोशल मीडियावर सुरु झालेली लढाई अजून थांबलेली नाही. पंत एक स्टोरी टाकून शांत झाला. पण उर्वशी अजूनही पोस्ट करुन भारतीय क्रिकेटरला लक्ष्य करतेय. उर्वशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याने तिने सुंदर ड्रेस परिधान केलाय. तिच्या पोस्टपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा आहे. अभिनेत्रीने आपल्या व्हिडिओ कॅप्शन मध्ये लिहिलय, ‘मी पूर्ण गोष्ट न सांगून तुझी इज्जत वाचवली’
#RishabhPant After Knowing #UrvashiRautela Has Come Up to watch to #IndiaVsPakistan Match ?#AsiaCup2022 #AsiaCup #INDvsPAK #INDvPAK #ViratKohli? #ViratKohli pic.twitter.com/SJ0YsVrf9u
— Journalist Himanshu Soni (@Vishusoni02) August 28, 2022
उर्वशीची ही पोस्ट पाहिल्यानंतर फॅन्सनी, उर्वशीने ही पोस्ट पंतबद्दलच केल्याची चर्चा सुरु झालीय. उर्वशीने एका मुलाखतीत सांगितलं की, RP नावाच्या एका व्यक्तीने तिला भेटण्यासाठी दिल्लीच्या हॉटेल मध्ये अनेक तास वाट पाहिली. त्यानंतर पंतने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करुन उत्तर दिलं. ‘माझा पाठलाग सोडं, खोटं बोलण्याची पण मर्यादा असते’, असं पंतने त्याच्या इन्स्टा स्टोरी मध्ये म्हटलं होतं.