मुंबई: बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड एक्वाटिक्स चॅम्पियनशिप (World Aquatics Championship) स्पर्धेत एक मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने एका महिला जलतरणपटूचे प्राण वाचले. अमेरिकेची स्विमर अनिता अल्वारेज (Anita Alvarez) बुधवारी नेहमीप्रमाणे आपले रुटीन फॉलो करत होती. पूलमध्ये ती स्विमींग करत होती. या दरम्यान अचानक ती बेशुद्ध झाली व पूलमध्ये बुडू लागली. सोलो फ्री फायनल दरम्यान हा अपघात घडला. अनिता कुठलीही हालचाल करत नाहीय, ती निपचित पडलीय हे लक्षात येताच तिच्या कोच अँड्रिया फुएन्टेस (Andrea fuentes) यांनी पूलमध्ये लगेच उडी मारली व तिचे प्राण वाचवले. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वचजण बिथरले. काही वेळासाठी स्पर्धास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनिता सुखरुप असल्याचं समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अनिता पूलमध्ये असताना, तिला व्यवस्थित श्वास घेता येत नव्हता. ही बाब तिच्या कोच अँड्रिया फुएन्टेस यांच्या लक्षात आली. आंद्रेने अनिताची स्थिती पाहून, लगेच पूल मध्ये उडी मारली व तिला बाहेर काढलं. आंद्रेने तिला पाण्यातून बाहेर काढलं.
त्यानंतर अनिताला स्ट्रेचवरुन पूलच्या मेडीकल सेंटरमध्ये नेण्यात आलं. तिची स्थिती पाहून सहकारी आणि प्रेक्षक टेन्शनमध्ये होते. अमेरिकेच्या जलतरण टीमने स्टेटमेंट प्रसिद्ध करुन तिची स्थिती चांगली असल्याची माहिती दिली.
अनिताच्या रुटीनमध्ये वाढ करण्यात आली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली, असं तिच्या कोच अँड्रिया फुएन्टेस यांनी स्पॅनिश रेडिओशी बोलताना सांगितलं. “मी लाइफ गार्ड्सला पाण्यात उतरायला सांगत होती. पण मी जे सांगत होती. ते त्यांना कळत नव्हतं, किंवा त्यांना ऐकू येत नव्हतं. तिला श्वास घेता येत नव्हता. ऑलिम्पिक फायनल असल्याप्रमाणे मला जितक्या वेगात शक्य होतं, तितक्या वेगात मी हे सर्व केलं” असं फुएन्टेस म्हणाल्या. तिचं ह्दय सुरु आहे का ? हे मी आधी तपासलं, ते सुरु होतं. नंतर तिला मी श्वासोश्वास घेण्यासाठी मदत केली, असं अँड्रिया फुएन्टेस म्हणाल्या. मागच्यावर्षी ऑलिंपिक पात्रता फेरीच्यावेळी सुद्धा ती अशीच बेशुद्ध झाली होती. आर्टिस्टिक स्विमींगमध्ये असं घडतं, नेहमीच असं होत नाही. पण काही वेळा अशा घटना घडतात, असं खेळाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांनी सांगितलं.
आर्टिस्टिक स्विमींग हा कलात्मक स्वीमिंगचा एक प्रकार आहे. यात जलतरणपटू संगीताच्या तालावर पूलमध्ये कलात्मक सादरीकरण करतात. हा महिलांचा क्रीडा प्रकार समजला जातो. आर्टिस्टिक स्विमींग हा कॅनडामध्ये विकसित झालेला क्रीडा प्रकार आहे. आर्टिस्टिक स्विमींगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
2 डिसेंबर 1996 रोजी अनिताचा जन्म झाला. ती 26 वर्षांची आहे. ती मेक्सिकन अमेरिकन आर्टिस्टिक स्विमर आहे. न्यूयॉर्कमध्ये रहाणाऱ्या अनिताने केनमोर वेस्ट सीनियर हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं. 2014 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिने प्रोफेशन स्वीमिंगची सुरुवात केली. ती अमेरिकेच्या सिंक्रोनाइज्य टीममध्ये होती. 2014 ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2015 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती सहभागी झाली होती.
अनिता मारिया कोरोलेवा या जोडीदारासह रियो ऑलिंपिक 2016 मध्ये सहभागी झाली होती. 2019 मध्ये तिने महिला दुहेरी आणि महिला टीमकडून लीमा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकलं. त्याचवर्षी तिला यूएसए सिंच्रो एथलीट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.