नवी दिल्ली: उत्तराखंड क्रिकेट टीमने रणजी ट्रॉफीच्या चालू स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. उत्तराखंडने ग्रुप-ए च्या पहिल्या मॅचमध्ये नागालँडच्या टीमला 174 रन्सनी हरवलं. मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नागालँडची टीम खूपच कमी धावांमध्ये ऑलआऊट झाली. नागालँडच्या टीमला विजयासाठी फक्त 200 धावांची आवश्यकता होती. पण नागालँडची टीम शुक्रवारी शेवटच्या दिवशी दुसऱ्याडावात फक्त 25 रन्सवर ऑलआऊट झाली. उत्तराखंडने विजयासह रणजी सीजनची सुरुवात केलीय.
नागालँडच्या टीमकडे आघाडी होती
उत्तराखंडने पहिल्या डावात 282 धावा केल्या होत्या. नागालँडच्या टीमने पहिल्या डावात 389 धावा केल्या. त्यांच्याकडे आघाडी होती. उत्तराखंडने आपला दुसरा डाव 7 विकेट गमावून 306 धावांवर घोषित केला. नागालँडच्या टीमला विजयासाठी 200 धावांची गरज होती. पण नागालँडची टीम आसपासपण पोहोचू शकली नाही.
7 बॅट्समन 0 वर OUT
दुसऱ्या इनिंगमध्ये नागालँड टीमच्या फलंदाजांनी खूपच खराब कामगिरी केली. त्याने सात फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. नागाहो चिशीने सर्वाधिक म्हणजे फक्त 10 धावा केल्या. जोशुआ ओजुकुम आणि इमलीवाटी लेमटुर यांनी प्रत्येकी सात रन्स केल्या. कॅप्टन होकाइटो झिमोमीने फक्त एक रन्स केला. त्याशिवाय अन्य फलंदाज खातही उघडू शकले नाहीत.
दोन बॉलर्स समोर संपूर्ण टीमच सरेंडर
उत्तराखंडच्या फक्त दोन गोलंदाजांनी नागालँडच्या संपूर्ण टीमला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मयंक मिश्राने 9 ओव्हर्समध्ये 4 रन्स देऊन 5 विकेट काढल्या. स्वप्निल सिंहने 9 ओव्हर्समध्ये 21 रन्स देऊन 4 विकेट काढल्या. सलामीवीर युगांधर सिंह शुन्यावर रनआऊट झाला.
‘या’ फलंदाजांची कमाल
उत्तराखंडच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांच्याकडून कुणाला चंदेलाने 92 धावा फटकावल्या. 129 चेंडूचा सामना त्याने केला. यात 16 चौकार लगावले. दिक्षांशु नेगीने 83 धावा केल्या. त्याने 13 चौकार आणि एक षटकार लगावला. अखिल रावतने 76 चेंडूत 56 धावा केल्या.
नागालँडकडून कोण चांगलं खेळलं?
नागालँडकडून पहिल्या डावात श्रीकांत मुंधेने शतक ठोकलं. त्याने 368 चेंडूंचा सामना केला. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 161 धावा फटकावल्या. युगांधर सिंहने 73 धावा फटकावल्या. उत्तराखंडकडून दुसऱ्याडावात प्रियांशू खंडुरीने 106 चेंडूत 73 धावा केल्या. स्वप्निल सिंहने नाबाद 88 धावा केल्या.