KL Rahul Selection Controversy : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी आणि वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये केएल राहुलला स्थान देण्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलय. केएल राहुल अजिबात फॉर्ममध्ये नाहीय. मागच्या अनेक महिन्यांपासून तो खूप खराब खेळतोय. मात्र तरीही टीम इंडियात तो आपलं स्थान टिकवून आहे. अन्य खेळाडूंना खराब प्रदर्शनाच कारण देऊन बाहेर बसवलं जातं. मग केएल राहुलला हाच नियम का लागू होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना पडलाय. याच मुद्यावरुन टीम इंडियाच्या दोन माजी खेळाडूंमध्ये फूट पडली आहे.
दोघांमधील तणाव आता वेगळ्या वळणावर
वेंकटेशन प्रसाद केएल राहुलच्या टीममधील निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत. त्याचवेळी दुसरा माजी खेळाडू आकाश चोपडा केएल राहुलच समर्थन करतोय. यावरुन या दोन माजी खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला आहे. दोघांमधील तणाव आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलाय.
टि्वटस चर्चेचा विषय बनतायत
वेंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडियावर केएल राहुल विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांचे टि्वटस चर्चेचा विषय बनतायत. त्याचवेळी आकाश चोपडा केएल राहुलच समर्थन करतायत. आकाश चोपडा आणि वेंकटेश प्रसादमध्ये सुरु झालेल्या या वादाने आता टोक गाठलय.
टि्वटमध्ये काय म्हटलेलं?
आकाश चोपडा यांनी टि्वटरवरुन वेंकटेश प्रसाद यांना चर्चेसाठी आपल्या युट्यूब चॅनलवर बोलावलं. विचारांमध्ये मतभेद स्वाभाविक आहेत. आपण यावर LIVE चर्चा करु शकतो, असं आकाश चोपडा यांनी टि्वटमध्ये म्हटलं होतं.
No Aakash, nothing is lost in translation. In your 12 minute video you have called me as an agenda peddler because it didn’t suit your narrative.
It is crystal clear. And I have made my points very clear in this Twitter thread. Don’t wish to engage with you further on this ?? https://t.co/GhlfWI0kHA
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 21, 2023
ऑफर धुडकावताना वेंकटेश प्रसाद काय म्हणाले?
आकाश चोपडा यांच्या या ऑफरवर वेंकटेश प्रसाद यांची रिएक्शन आली आहे. त्यातून हा वाद एका नव्या वळणावर जाताना दिसतोय. वेंकटेश प्रसाद यांनी सर्वप्रथम आकाश चोपडा यांची ऑफर धुडकावली. टि्वटच्या शेवटच्या ओळीत प्रसाद यांनी, आता या विषयावर मला तुझ्याशी बोलायचच नाही, असं लिहिलं.
त्या व्हिडिओ बकवास ठरवलं
मला बोलायचच नाही, हा स्टँड वेंकटेश प्रसाद यांनी कधी घेतला. त्याची सुरुवात आकाश चोपडाच्या एका व्हिडिओपासून झाली. चोपडा यांनी केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओत त्यांनी सेना देशांविरुद्ध राहुलच्या कामगिरीचे आकडे दिले होते. वेंकटेश प्रसाद यांनी आकाश चोपडाच्या त्या व्हिडिओ बकवास ठरवलं व नाराज झाले.