नवी दिल्ली : भारतातील देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंट दुलीप ट्रॉफीसाठी टीमची घोषणा झालीय. दुलीप ट्रॉफी ही देशातील महत्वाची क्रिकेट स्पर्धा आहे. दुलीप ट्रॉफीसाठी टीम्सची घोषणा करण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफीसाठी टीमच्या निवडीवरुन वाद निर्माण झालाय. टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी सिलेक्टर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. सिलेक्शन प्रोसेसवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सिलेक्टर्सनी एका खेळाडूकडे दुर्लक्ष केलय.
या खेळाडूने टि्वटरवर आपली नाराजी व्यक्त केली. वेंकटेश प्रसाद यांनी त्या खेळाडूच समर्थन केलय. त्याच्यासाठी आवाज उठवलाय.
मनातली नाराजी बोलून दाखवली
दुलीप ट्रॉफीसाठी झालेल्या टीम सिलेक्शनवर जलज सक्सेनाने नाराजी व्यक्त केली. तो केरळकडून खेळतो. जलजची साऊथ झोनच्या टीममध्ये निवड झालेली नाहीय. जलज देशांर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत होता. चांगल्या कामगिरीनंतरही निवड न झाल्याने जलजने मनातली नाराजी व्यक्त केली. भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी जलजच समर्थन केलय.
जलज कुठल्या टीमकडून खेळतो?
सिलेक्टर्सनी जलजच्या जागी टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरची निवड केली. जलजने मागच्या रणजी ट्रॉफी सीजनमध्ये आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली होती. सर्वाधिक विकेट त्याने काढले होते. हा प्लेयर आधी मध्य प्रदेशकडून खेळायचा. आता तो केरळकडून खेळतो.
Highest wicket taker in Ranji trophy in India( Elite Group) didn’t get picked in Duleep trophy. Can you please check whether it has ever happened in the Indian Domestic history? Just wanted to know. Not blaming anyone ? https://t.co/Koewj6ekRt
— Jalaj Saxena (@jalajsaxena33) June 17, 2023
‘कोणासोबत असं झालय का?’
जलजने सिलेक्टर्सनी केलेल्या दुर्लक्षावर टि्वटमध्ये टोमणा मारलाय. ज्याने रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुपमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या, त्याची दुलीप ट्रॉफीमध्ये निवड झाली नाही. देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात कधी असं झालय की, नाही हे कोणी सांगू शकतं का? मला कोणाला दोष द्यायचा नाहीय. फक्त जाणून घ्यायचत आहे असं त्याने म्हटलय. जलजने रणजी ट्रॉफी सीजनच्या सात सामन्यात 50 विकेट घेतल्या आहेत.
There are many laughable things happening in Indian cricket. The highest wicket taker in Ranji Trophy not being picked even for the South Zone team is as baffling as it gets. Just renders the Ranji Trophy useless..what a shame https://t.co/pI57RbrI81
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) June 18, 2023
भारतीय क्रिकेटमध्ये काय चाललय?
जलजने जे टि्वट केलय, त्यावर भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी रिट्विट केलय. “भारतीय क्रिकेटमध्ये सध्या ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्यावर हसायला येतं. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्याला साऊथ झोनच्या टीममध्ये निवडलं नाही” असं वेंकटेश प्रसाद यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलय.