मुंबई: विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याला प्रभाव पाडता आला नाही. दुसऱ्या मॅच मध्ये 1 आणि तिसऱ्या सामन्यात 11 रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीच्या बॅट मधून धावा जणू आटल्या आहेत. त्याचा परफॉर्मन्स सुधारला नाही, तर पुढच्या मालिकेसाठी संघातून वगळण्याचे संकेत निवड समितीने आधीच दिले आहेत. इंग्लंड नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (West Indies Tour) जाणार आहे. तिथे टीम इंडिया तीन वनडे आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. वनडे साठी संघ निवडण्यात आला आहे. पण टी 20 सीरीजसाठी अजूनही संघ निवड झालेली नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील प्रदर्शन पाहून संघ निवडण्यात येणार होता. विडिंज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विराट कोहलीला संघातून डच्चू मिळू शकतो. असं झाल्यास, विराटच्या जागी दुसऱ्याएखाद्या खेळाडूला संधी मिळू शकते. त्याने दमदार प्रदर्शन केलं, तर विराटसाठी पुढचा मार्ग अजून कठीण होऊन बसेल. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्साठी इन फॉर्म दीपक हुड्डाला बसवण्यात आलं.
त्याच्याजागी विराटला संधी दिली. पण विराट अपयशी ठरला. तेच दीपक हुड्डाने आयर्लंड विरुद्धच्या दोन्ही टी 20 सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. शतक झळकावलं होतं. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं होतं. विराट फॉर्म मध्ये नसताना, अशा खेळाडूला बाहेर बसवणं, संघाला परवडणारं नाही. विराट कोहलीला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
आधीच कपिल देव यांनी विराटवर टीक केली आहे. अश्विनला बाहेर बसवलं जातं, मग कोहलीला का नाही? असा सवाल त्यांनी केलाय. आता भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केलाय.
Changed drastically now, where there is rest for being out of form. This is no way for progress. There is so much talent in the country and cannot play on reputation. One of India’s greatest match-winner, Anil Kumble sat out on so many ocassions, need action’s for the larger good
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) July 10, 2022
“एकवेळ अशी होती की, तुमची कितीही प्रतिष्ठा असली, पण तुम्ही फॉर्म मध्ये नसाल, तर तुम्हाला संघातून वगळलं जायच. सौरव, सेहवाग, युवराज, झहीर आणि हरभजन या सगळ्यांना फॉर्म नसल्यामुळे संघातून वगळण्यात आलय. त्यांना देशातंर्गत स्पर्धांमध्ये खेळावं लागलं. त्यांनी धावा केल्या नंतर संघात कमबॅक झालं. तो निकष आता बदलला गेलाय, असं वाटतं. फॉर्म मध्ये नसाल, तर आता विश्रांती दिली जाते. प्रगतीचा कुठलाही मार्ग दिसत नाही. देशात आता खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. प्रतिष्ठेवर तुम्ही खेळू शकत नाही. भारताचे महान मॅच विनर अनिल कुंबळे यांना कित्यकेदा बाहेर बसावं लागलय. काहीतरी मोठं चांगल होण्यासाठी कृती गरजेची आहे” असं वेंकटेश प्रसाद यांनी टि्वट करुन म्हटलं आहे.