मुंबई: वर्ष 2007 मध्ये भारताने, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) जिंकला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली. टी 20 वर्ल्ड कप विजयाच्या त्या आठवणी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात ताज्या आहेत. एमएस धोनी, (MS Dhoni) युवराज सिंह, गौतम गंभीर या युवा खेळाडूंना त्यावेळी विजयाचं श्रेय देण्यात आलं होतं. पण त्या ऐतिहासिक विजयात वेंकटेश प्रसाद यांचही योगदान तितकच महत्त्वाच होतं. वेंकटेश प्रसाद (venkatesh prasad) त्यावेळी टीमचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. वेंकटेश प्रसाद भारताचे एक उत्तम क्रिकेटर आहेत. त्यांची कोचिंगही तितकीच जबरदस्त होती. आता हेच वेंकटेश प्रसाद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत.
वेंकटेश प्रसाद यांचा एक फोटो सध्या चर्चेमध्ये आहे. वेंकटेश प्रसाद यांनी स्वातंत्र्यदिनी एक फोटो पोस्ट केला. त्यात ते खूप बारीक झाल्याच दिसत आहे. वेंकटेश प्रसाद यांचा तो फोटो पाहून चाहत्यांना एकच धक्का बसला. टि्वटरवर फॅन्सनी प्रसाद यांच्या प्रकृतीची चौकशी केली. फोटोवर आलेल्या कमेंट पाहून प्रसाद यांनी सुद्धा त्यामागचं कारण सांगितलं.
Freedom in the mind, Faith in the words, Pride in our Souls.
Salute the nation on this #IndependenceDay pic.twitter.com/M8tmJseAci
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) August 15, 2022
वेंकटेश प्रसाद यांनी एका युजरच्या टि्वटवर उत्तर देताना सांगितलं की, “साधना करत असल्यामुळे आपलं वजन कमी झालय. मी पूर्णपणे ठीक आहे. माझं स्वास्थ चांगलं आहे. मी तिरुवंदमलई मध्ये अरुणाचला पर्वताच्या परिक्रमेसाठी गेलो होतो. थोडं वजन कमी झालय. पण आतून मला खूप ऊर्जावान असल्याची अनुभूती होत आहे. मी लवकर वजन वाढवीन. काळजीने माझी विचारपूस केल्याबद्दल आपले आभार”
I am absolutely fine and in the best of health.
Was on a Sadhana and had done Girivalam in Tiruvanamalai around Arunachala mountain and was on a very light diet. Have lost some weight but feel very energetic and alive. Will regain weight soon. Thank you v much for your concern. https://t.co/p5SVbrXpBK— Venkatesh Prasad (@venkateshprasad) August 16, 2022
वेंकटेश प्रसाद आजही 1996 वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनल मॅचसाठी आठवतात. पाकिस्तान विरुद्धच्या या मॅच मध्ये आमिर सोहेलला दिलेलं उत्तर आजही चाहते विसरलेले नाही. या सामन्यात आधी आमिर सोहेलने वेंकटेश प्रसाद यांच्या चेंडूवर चौकार मारला व हाताने सीमारेषेकडे इशारा केला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर प्रसाद यांनी त्याला क्लीन बोल्ड केलं व जशास तसं पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा दिला. आजही तो किस्सा क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे.