नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये इतिहास रचला. महाराष्ट्राच कर्णधारपद भूषवताना ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेश विरुद्ध नाबाद 220 धावा फटकावल्या. या दरम्यान 159 चेंडूत त्याने 10 चौकार आणि 16 षटकार लगावले.
इतिहासातील 5 मोठे रेकॉर्ड तोडले
गायकवाडने आजच्या सामन्यात इतिहासातील 5 मोठे रेकॉर्ड तोडले. लिस्ट ए क्रिकेट मॅचमध्ये एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संयुक्तपणे तो पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. रोहितने सुद्धा एका इनिंगमध्ये 16 षटकार लगावले होते.
49 व्या षटकात काय घडलं?
गायकवाडने 49 व्या षटकात शिवा सिंहच्या गोलंदाजीवर 7 षटकार मारले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं, जेव्हा एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारले गेले.
गायकवाड यांच्या एक पाऊल पुढे
मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक 43 धावा बनवणारा गायकवाड पहिला फलंदाज बनला आहे. त्याशिवाय एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा प्लेयर बनला आहे.
सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंह, कायरन पोलार्ड. थिसारा परेरा, रॉस व्हाइटले, जजाई यांनी वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारले आहेत. गायकवाड यांच्या एक पाऊल पुढे आहे. त्याने सात सिक्स मारले.
आर.समर्थला मागे टाकलं
ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज बनलाय. त्याने कर्नाटकच्या आर.समर्थला मागे टाकलं. त्याने मागच्यावर्षी क्वार्टर फायनलमध्ये केरळ विरुद्ध 192 धावा फटकावल्या होत्या.