Prithvi Shaw Triple Century: पृथ्वी शॉ ने रणजी ट्रॉफी सामन्यात ट्रिपल सेंच्युरी झळकवून सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलय. कुठल्याही सीरीजसाठी टीम निवडताना पृथ्वी शॉ च्या नावाची जरुर चर्चा होते. पण त्याला संधी मिळत नाही. असं नाहीय की. पृथ्वीची याआधी टीम इंडियात निवड झालेली नाही. पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून खेळलाय. पण खराब प्रदर्शन, दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या बाहेर गेला. तेव्हापासून पुनरागमनासाठी हा टॅलेंटेड खेळाडू संघर्ष करतोय. अशाच एका टूरवर असताना, विराट कोहलीने पृथ्वीला शिवी घातली होती. त्यावेळी विराट टीमचा कॅप्टन होता. हे शिवीकांड घडल्यानंतर पृथ्वीला फक्त चार सामने संधी मिळाली आणि तो टीमबाहेर गेला.
संजय मांजरेकरांचा रेकॉर्ड मोडला
पृथ्वी शॉ ने आसाम विरुद्ध गुवाहाटीच्या मैदानावर मुंबईकडून सर्वाधिक व्यक्तीगत धावा केल्या. त्याने 379 धावा बनवताना संजय मांजरेकर यांचा 1991 सालचा 377 धावांचा रेकॉर्ड मोडला. मांजरेकर यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये या धावा केल्या होत्या.
किती वर्षापासून पृथ्वी टीम इंडियाच्या बाहेर?
मोठ्या इनिंग खेळणाऱ्या पृथ्वी शॉ ला विराट कोहलीकडून शिवी ऐकावी लागली होती. या शिवीकांडानंतर पृथ्वी फक्त चार सामने खेळला. पृथ्वी तेव्हापासून जो बाहेर गेलाय, तो अजून टीममध्ये पुनरागमन करु शकलेला नाही. टीम इंडिया बाहेर जाऊन त्याला दीडवर्ष झालय.
नेमकं काय घडलेलं?
वर्ष 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात एडिलेडच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होती. टेस्ट मॅचच्या दुसऱ्यादिवशी मैदानात पृथ्वीकडून एक चूक झाली, जी विराटला अजिबात सहन झाली नाही. त्या रागाच्या भरात विराटने पृथ्वीला शिवी घातली.
बुमराह हसत होता
एडिलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु होता. बुमराह इनिंगची 23 वी ओव्हर टाकत होता. स्ट्राइकवर असलेल्या लाबुशेनला बाऊन्सर टाकला. लाबुशेनने चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्क्वेयर लेगला असलेल्या पृथ्वीकडे गेला. पृथ्वीकडे सोपा झेल घेण्याची संधी होती. पण त्याने कॅच ड्रॉप केली. शॉ ने कॅच टाकल्यानंतर बुमरागच्या चेहऱ्यावर हास्य होते. विराटला भरपूर राग आला. त्याच रागात विराटने त्याला शिवी घातली.