Virats baby | विराटच्या घरी छोट्या पाहुण्याच आगमन झालय. 15 फेब्रुवारीला वामिकाच्या छोट्या भावाच या जगात आगमन झालं. विराट-अनुष्का जोडीच हे दुसर अपत्य आहे. विराटला पहिली मुलगी असून तिच नाव वामिका आहे. मुलीप्रमाणे विराटने आपल्या मुलाच नावही एकदम हटके ठेवलय. विराटने मुलाच नाव अकाय ठेवलय. ऐकताच क्षणी हे नाव पूर्णपणे वेगळ वाटतं. अनेकजण इंटरनेटवर अकाय या नावाचा अर्थ शोधतायत. अनुष्का आणि कोहलीने आपल्या मुलाच नाव इन्स्टाग्रामवर शेअर केलय तेव्हापासून ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला देखील तुमच्या मुला-मुलीच एकदम युनिक, हटके नाव ठेवायच असेल, तर या प्लॅटफॉर्मचा आधार घेऊ शकता.
कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याच्या नावावरुन होते. जन्माच्या वेळच नाव सावलीसारख आयुष्यभर सोबत असतं. अशावेळी मुला-मुलीच नाव ठेवताना थोडी मेहनत करावी लागली, तरी हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला काही अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहिती देणार आहोत, जे जन्म तारखेच्या हिशोबाने शानदार नाव सुचवतात.
InstaAstro वर बर्थ डेट टाकून चेक करा नाव
या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एकापेक्षा एक सरस ऑप्शन मिळतील. यासाठी तुम्हाला गुगलच्या सर्चबारवर InstaAstro लिहून सर्च करा. इथे तुम्हाला बेबी नेम कॅलक्युलेटरचा ऑप्शन दिसेल.
यात 4 ऑप्शन असतील. पहिल्या ऑप्शनमध्ये जेंडर भरा, दूसऱ्या ऑप्शनमध्ये बर्थ डेट भरा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये जन्माची वेळ आणि चौथ्या पर्यायात कुठे जन्म झाला ते ठिकाण लिहा.
हे सर्व डिटेल्स व्यवस्थित भरल्यानंतर कॅलक्युलेटच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला नावांचे एकापेक्षा एक सरस पर्याय मिळतील.
drikPnachang उत्तम नाव मिळेल
तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगल्या नावाचा विचार करत असाल, तर प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नाव, बर्थ डेट आणि बर्थ प्लेसची माहिती दिल्यानंतर चांगल्या नावाचे पर्याय मिळतील.