Anushka in London : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या त्यांच्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवत आहे. अनुष्काला आधी मुलगी आहे जिचे नाव वामिका आहे. तर 15 फेब्रुवारीला तिने मुलाला जन्म दिलाय त्याचं नाव अकाय असं ठेवण्यात आले आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी मुलगा अकायच्या जन्माची गोड बातमी शेअर केली होती. आता सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, विराट कोहली हा लंडनला शिफ्ट होणार आहे. कारण अनुष्का ही लंडनमध्येच आहे. जवळपास 5 महिन्यांपासून ती लंडनमध्ये आहे.
विराट कोहली भारतात परतला असता तरी अनुष्का शर्मा मात्र लंडनमध्येच आहे. ती मुलांसोबत यूकेमध्ये राहत आहे. त्यामुळे विराट कोहली देखील लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा आहेत. अनुष्का डिसेंबर 2023 मध्ये भारतात होती. पण जेव्हा तिने मुलाला जन्म दिला तेव्हा फेब्रुवारी 2024 मध्ये ती यूकेमध्ये होती. अजूनही ती तिथेच राहत आहे. त्यामुळे अनुष्का तिच्या कुटुंबासोबत कायमची यूकेला शिफ्ट होऊ शकते असा अंदाज लोकं बांधत आहेत.
मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराट कोहली भारतात दिसलाय. तो 22 मार्च 2024 रोजी सुरु होत असलेल्या आयपीएलचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहेत. विराट देखील या सामन्याचा भाग असणार आहे. काही लोकांचा असा अंदाज आहे की तो आपल्या कुटुंबासोबत लंडनलाच शिफ्ट होण्याचा विचार करीत आहे.
विराट कोहली आयपीएलसाठी भारतात आला आहे. पण आयपीएल संपल्यानंतर तो पुन्हा यूकेला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे तर काही लोकांनी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं लंडनमध्ये देखील घर असल्याचं बोललं जातं. लंडनमध्ये जन्मलेल्या अकायला तिथलेच नागरिकत्व मिळेल असे नाही. नियमांनुसार, तेथील नागरिकत्व मिळविण्यासाठी, पालकांपैकी एक जण यूकेचा नागरिक असणे आवश्यक आहे. आई-वडील बराच काळ तेथे राहत असले तरीही त्यांच्या मुलाला यूकेचे नागरिकत्व मिळू शकते.