Virat kohli and Hardik Pandya: टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली आणि ऑलराऊंडर हार्दिक पंड्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याची माहिती समोर येतेय. मंगळवारी गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना झाला. त्यावेळी असं एक दृश्य पहायला मिळालं, ज्यामुळे सगळेच हैराण झालेत. सोशल मीडियावर स्टार बॅट्समन विराट कोहली आणि ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावरुन टीम इंडियाच्या या दोन्ही स्टार प्लेयर्समध्ये मतभेद निर्माण झाल्याचा अंदाज बांधला जातोय.
हार्दिकने विराटला अपमानित केलं?
ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या एका कृतीमुळे फॅन्सच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतय. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडे मॅचच्या दुसऱ्याडावात टीम इंडियाची फिल्डिंग सुरु होती. विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशनसाठी सर्व खेळाडू एकत्र जमले होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने आपल्या कृतीतून विराट कोहलीला अपमानित केल्याचा सूर सोशल मीडियावर आहे.
विराट त्याला त्याचवेळी काही शब्द बोलला
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय, विकेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू परस्परांना हाई फाइव करत होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने तिथे आलेल्या विराट कोहलीकडे दुर्लक्ष केलं. विराटने हाई फाइवसाठी हात पुढे केला होता. पण हार्दिकने दुर्लक्ष केलं. विराटच्या डोक्यावरील कॅपही हलवून टाकली. त्यावेळी ‘थोडं बघत जा’ असं विराट हार्दिकला म्हणाला. हार्दिक पंड्याने, तरी विराटकडे दुर्लक्ष केलं. त्याच्याशी काहीच बोलला नाही. हार्दिकने ही कृती अजाणतेपणी केली असेल, पण त्यावरुन टीममधल्या या दोन स्टार प्लेयर्समध्ये मतभेद असल्याचा अर्थ काढला जातोय.
आज विजयी आघाडीची संधी
टीम इंडियाने मंगळवारी गुवाहाटी वनडेमध्ये श्रीलंकेला 67 धावांनी हरवलं. भारताने या सामन्यात स्टार बॅट्समन विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर विजय मिळवला. विराटने या सामन्यात वनडे करिअरमधील आपली 45 वी सेंच्युरी झळकवली. त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या. यात 12 फोर आणि 1 सिक्स आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये वनडे सीरीजचा दुसरा सामना आज 1.30 वाजता सुरु होईल. कोलकाता येथे हा सामना होईल. दुसरा सामना जिंकून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्याच्या वनडे सीरीजमध्ये विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.