दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा यंदाच्या टी -20 विश्वचषकातील (T20 World Cuo 2021) दुसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात काही वेळातच सुरु होणार आहे. सध्या तरी सामन्यापूर्वी दोन्ही संघ आपआपले अंतिम खेळाडू निश्चित करत असतील. आतापर्यंत संघाने निर्णय घेतलाही असू शकतो. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ ज्या संघाविरुद्ध लढण्याची तयारी करत आहे, त्याच संघाचं कौतुक भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहेत.
कोणत्याही संघाचा कर्णधार किंवा महत्त्वाचा खेळाडू प्रतिस्पर्धी संघाबद्दल सामन्यापूर्वी इतके कौतुकाचे बोल बोलतो, यामागे नक्कीच काहीतरी कारण असून शकते. तर रोहित आणि विराटने केलेल्या या कौतुकामागेही नक्कीच नाही रणनीती असणार. कदाचित असे करुन ते न्यूझीलंडचा आत्मविश्वास अतिप्रमाणात वाढवून सामन्यात त्यांच्याकडून चूक होईल अशासाठी हा माईंड गेम खेळत असावे किंवा इतरही कारण यामागे असू शकतं. दरम्यान हे कौतुक त्यांनी स्टार स्पोर्ट्सच्या मुलाखतीत दिलं असून हा व्हिडीओ ट्विटरवरही पोस्ट करण्यात आला आहे.
विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध बोलताना म्हणाला,“न्यूझीलंडचा संघ अशा संघात मोडतो, जो खेळत असताना सहसा कोणती चूक करत नाही. हीच कीवी टीमची सर्वात मोठी ताकद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी चूका केल्यास तुमचे जिंकण्याचे चान्सेस आपोआपच वाढतात. त्यांनी 2015 आणि 2019 वर्ल्ड कप फायनलपर्यंत मजल मारली. आम्हालाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मात दिली. या साऱ्याचं श्रेय त्याच्या संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंना जात.” तर रोहितच्या मते न्यूझीलंडकडे उत्तम बोलिंग अटॅक असून प्रत्येक फलंदाजाला बाद करण्यासाठी त्यांच्याकडे एक वेगळा प्लान असल्याचंही रोहितने म्हटलं आहे.
“They’re not a team that makes many mistakes, and that’s been their strength.” – @imVkohli on New Zealand#FollowTheBlues to hear more from the skipper himself:
Today, 9 AM & 12 PM | Star Sports Network pic.twitter.com/gYBYwncsHS
— Star Sports (@StarSportsIndia) October 31, 2021
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), टीम सैफर्ट, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
इतर बातम्या
(Virat kohli and Rohit Sharma Praises team New Zealand before india vs new zealand T20 world Cup match)