भारतीय टीमने शनिवार टी-20 विश्वकप जिंकला. त्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु असताना क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले. त्यांनी जल्लोष सुरु केला. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला. त्यांनी टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहित-विराटच्या जोडीला हा धक्का होता. दोन्ही खेळाडूंनी यासंदर्भात कधी विचार केला? कधी निर्णय घेतला? सहकाऱ्यांशी चर्चा केली का? यासंदर्भात सूर्यकुमार यादव याने एका वृत्तवाहिनीला सांगितले. ड्रेसिंग रुममध्ये या निर्णयानंतर काय घडले, ते सूर्यकुमार यादव याने सांगितले.
सूर्यकुमार यादव याने सांगितले की, दोघांची टी-20 मधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यांना आणखी एक मोठी टुर्नामेंट खेळावी, असा आग्रह सहकारी खेळाडूंनी सुरु केला. परंतु रोहित आणि विराट हे दोन्ही खेळाडू आपल्या निर्णयावर ठाम होते.
सूर्यकुमार यादव यांनी सांगितले की, टीम चॅम्पियन बनल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु विराट आणि रोहित याच्या निर्णयानंतर ड्रेसिंगरुममधील आनंदाचे वातावरण भावनिक झाले. सर्व जण इमोशनल झाले. आता हा निर्णय घेऊ नका. पुढील वर्ल्डकप भारतात होणार आहे. अजून दीड ते दोन वर्ष खेळा. त्यानंतर हा निर्णय घ्या, असे त्यांना सर्व जण सांगू लागले. परंतु दोन्ही खेळाडूंनी आपला निर्णय ठरवला होता. त्यापासून माघार घेण्यास ते तयार नव्हते. दोघांनी आपला निर्णय ठरवला होता.
सूर्यकुमार यादव म्हणाला, विश्वविजेते बनल्यानंतर निवृत्ती घेणे अवघड असते. संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कमतरता जाणवणार आहे. टी-20 विश्वचषकात विराट कोहली अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. त्यापूर्वी इतर सर्व सामन्यात तो फलंदाजीत चमक दाखवू शकला नव्हता. परंतु अंतिम सामन्यात विराट कोहलीने केलेल्या खेळीमुळे भारत विजयी झाला.