मुंबई: वेळ सतत बदलत असते. कोणाचे तेच दिवस राहत नाहीत. सगळ्यांचे दिवस बदलतात. कोणी शिखरावरुन उतरणीला लागतो, तर एखादा तळाला असलेला शिखरावर जातो. कोणाचं नशीब, कधी पालटेल हे सांगता येत नाही. त्यामुळे पाय नेहमी जमिनीवर ठेवणं आवश्यक असतं. काल रात्री हाँगकाँग विरुद्धच्या (IND vs HKG) सामन्याच्यावेळी ही गोष्ट विराट कोहलीच्या (Virat kohli) लक्षात आली असेल. सध्या भारतीय क्रिकेट मध्ये सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) दिवस आहेत. सूर्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅटमधून अगदी सहज चौकार, षटकार निघतायत. सध्याचा त्याचा खेळ पाहिल्यानंतर भविष्यातील मोठा स्टार दिसतो. दुसऱ्याबाजूला मोठा स्टार असलेला विराट कोहली आज संघर्ष करतोय. विराटची कराकिर्द उतरणीला लागली आहे. दोन वर्षांपूर्वी विराटने ज्या क्रिकेटपटूला डोळे दाखवले होते, आज त्याच्यासमोरच विराटला झुकाव लागलं.
आशिया कप मध्ये बुधवारी भारत आणि हाँगकाँग मध्ये सामना झाला. टीम इंडियाने हा सामना 40 धावांनी जिंकला. भारताकडून विराट कोहलीने या सामन्यात बऱ्याच कालावधीनंतर अर्धशतक झळकावलं. पण या सामन्यात खरी रंगत आणली ती सूर्यकुमार यादवने. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्याने धावांचा पाऊस पाडला. धीम्या गतीने सुरु असलेल्या भारतीय इनिंग मध्ये त्याने जान आणली. धावांचा वेग वाढवला. त्यामुळे भारताला 192 धावांचा डोंगर उभारता आला.
सूर्यकुमार यादवने या सामन्यात फक्त 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं. टी 20 क्रिकेट मधील त्याच हे वेगवान अर्धशतक आहे. सूर्यकुमार यादवने लास्ट ओव्हर मध्ये एकूण चार षटकार मारले. त्याने 26 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. भारताचा डाव संपल्यानंतर पॅव्हेलियन मध्ये परतताना विराट कोहली आपल्या जागेवर थांबून सुर्याची वाट पाहत होता. सूर्यासमोर येताच कोहलीने त्याच्या खेळीच्या सन्मानार्थ आपली मान झुकवली.
दोन वर्षापूर्वी याच यूएईच्या मैदानात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आमने सामने आले होते. आयपीएल 2020 ची ही घटना आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर मध्ये सामना होता. ऑक्टोबर महिन्यात त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली होती. आयपीएल मध्ये शानदार कामगिरी करुनही सूर्यकुमारची संघात निवड झाली नव्हती.
Should we bow?
Y̶e̶s̶,̶ ̶h̶e̶’̶s̶ ̶a̶ ̶k̶i̶n̶g̶ Yes, the King himself does!DP World #AsiaCup2022 #BelieveInBlue #SuryakumarYadav #INDvHK #INDvHKG #ViratKohli #KingKohli pic.twitter.com/IDmxM0Z8Fu
— Star Sports (@StarSportsIndia) August 31, 2022
संघ निवडीनंतर मुंबई इंडियन्स आणि आरसीबी मध्ये सामना होता. सूर्याने त्या मॅच मध्ये स्वबळावर जबरदस्त प्रदर्शन करुन मुंबईला सामना जिंकून दिला. या मॅच मध्ये सूर्या आणि कोहली आमने-सामने आले होते. त्यावेळी कोहलीने आपल्या नजरेनेच सूर्यकुमारला राग दिला होता. कोहलीच्या या वर्तनावर त्यावेळी बरीच टीका झाली होती. त्यावेळी विराट मोठा स्टार होता. आज हेच चित्र बदललय.