नवी दिल्ली: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. विराटने अचानक कर्णधारपद सोडल्याने उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. विराटने हा निर्णय का घेतला? निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआयशी चर्चा केली होती का? कर्णधारपद सोडल्यानंतर विराट नेमका काय म्हणाला? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रचंड थकवा आल्याने विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना विराटने बीसीसीआयच्या एकाही अधिकाऱ्याशी चर्चा केली नव्हती. त्यामुळे विराटचा हा निर्णय बीसीसीआयसाठीही धक्कादायक होता, असं सांगितलं जात आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी तो भरभरून बोलला होता. तेव्हा या दौऱ्यानंतर विराट कर्णधारपद सोडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. जेव्हा त्याने कसोटीचं कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतला तेव्हा त्याने बीसीसीआयशी औपचारिक संवाद साधताना आता मी थकलोय एवढंच सांगितलं होतं.
कोहलीच्या निर्णयानंतर बोर्डाचे सचिव जय शहा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शहा यांनी ज्या वेगाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यावरून त्यांनी विराटचा राजीनामा स्वीकारल्याचं स्पष्ट होतं. सीरिजमध्ये पराभव पत्करावा लागला. मनासारख्या धावा काढता आल्या नाहीत. त्यामुळे विराट निराश झाला होता. त्याने त्याचा स्टाफही बदलला होता. माहितीनुसार राहुल द्रविड आता भविष्यातील टीमवर फोकस करत आहे. विराट केवळ टीम मेंबर म्हणून संघात असेल त्या दृष्टीने द्रविडकडून रणनीती आखली जात आहे.
विराटने कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता कसोटीचा कर्णधार कोण होणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. केएल राहुलकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पीटीआयच्या वृत्तानुसार रोहीत शर्माकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं. मात्र, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कसोटी कर्णधारपदासाठी ऋषभ पंतच्या नावाला पसंती दिल्याने ट्विस्ट आला आहे. एकाच वेळी तीन खेळाडूंच्या नावांची कर्णधारपदासाठी चर्चा सुरू झाल्याने कसोटी कर्णधार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताचा पुढचा कसोटी सामना हा श्रीलंकेच्या संघासोबत होणार आहे. भारत आणि श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
Virat Kohli Test Captaincy : Shocked!! विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर रोहित शर्माची रिअॅक्शन…#ViratKohli #ViratKohliResigns #BCCI #RohitSharma https://t.co/R5symIzeGh
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2022
संबंधित बातम्या:
#Virat Kohli| ‘चॅम्पियन तुझा आम्हाला अभिमान आहे’ विराटचा भाऊ विकास कोहलीने लिहिली भावनिक पोस्ट
Virat Kohli Test Captaincy: कर्णधारपद सोडताच विराटवर टांगती तलवार, कसोटी संघात स्थान टिकणार का?