मुंबई: भारताचा अव्वल क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या आपल्या करीयर मधल्या सर्वात खराब फॉर्म मध्ये आहे. लोक भले त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, पण पैसा कमावण्याच्या बाबतीत आजही त्याचा जलवा कायम आहे. एका ताज्यारिपोर्ट्नुसार, विराट कोहली आशिया मध्ये सर्वात जास्त पैसा कमावणारा खेळाडू आहे. Hopperhq.com च्या रिपोर्ट्नुसार विराट कोहलीला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी (Instagram Post) 8.69 कोटी रुपये मिळतात. विराट कोहली कुठल्याही आशियाई क्रीडापटू आणि सेलिब्रिटीपेक्षा पुढे आहे. जगामध्ये त्याचा तिसरा नंबर लागतो.
विराट कोहलीच्या आधी अर्जेंटिना महान फुटबॉलपटू मेसी आहे. हा दिग्गज खेळाडू एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 14 कोटी रुपये घेतो. म्हणजेच मेसीची एका पोस्टची कमाई विराट कोहलीपेक्षा साडेपाच कोटींनी जास्त आहे. इन्स्टाग्राम पोस्ट मधून सर्वात जास्त कमाई पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो करतो. रोनाल्डोला एका इन्स्टाग्रामपोस्टसाठी 19 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच रोनाल्डो विराट कोहलीपेक्षा दुप्पट पैसा कमावतो.
इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स ख्रिस्तियानो रोनाल्डोचे आहेत. रोनाल्डोला 53 कोटीपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. मेसीला 34 कोटी पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. विराट कोहलीचे 20 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स असून जगात तो 17व्या क्रमांकावर आहे.