मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) क्रिकेट विश्वातील एक लोकप्रिय खेळाडू आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. विराट कोहलीची फलंदाजी, व्यक्तीमत्त्वाची अनेकांना भुरळ पडते. विराट कोहलीचा आज मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर (Social Media) त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. विराट कोहलीला अशीच एक फॅन ऑस्ट्रेलियात (Australia) भेटली आहे, जी त्याची खूप मोठी चाहती आहे.
अमीषा बसेरा असं विराट कोहलीच्या या फॅनच नाव आहे. ब्रिस्बेनमध्ये तिने विराट कोहलीची भेट घेतली. अमीषाने विराट कोहलीशी चर्चा केली. त्याच्यासोबत एक फोटो काढला.
तिच्या या सौंदर्याने भुरळ घातली
अमीषा बसेरा आणि विराट कोहलीचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विराटच्या ही फॅन खूपच सुंदर आहे. सोशल मीडियावर अनेकांना तिच्या या सौंदर्याने भुरळ घातली आहे. अमीषा क्वीन्सलँडमध्ये शिक्षण घेत आहे. तो युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडची विद्यार्थिनी आहे.
विराटमुळे तिचा तिप्पट फायदा
अमीषा बसेराने विराट कोहलीसोबतचा आपला फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्यावेळी तिच्या फॉलोअर्सची संख्या 1000 च्या हजारच्या आसपास होते. विराट सोबतचा फोटो पोस्ट केल्यानंतर तिचे फॉलोअर्स तिप्प्टीने वाढले आहेत.
दुसरी वॉर्मअप मॅच कधी?
टीम इंडिया आज ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वॉर्मअप मॅच खेळत आहे. हा सामना म्हणजे टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप तयारीचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहली 19 धावा काढून आऊट झाला. आता बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध दुसरा सराव सामना होईल.