दुबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आता संपूर्णपणे आयपीएलसाठीन (IPL) सज्ज झाला आहे. इंग्लंडमधून युएईत पोहोचलेला विराट नुकताच विलगीकरणाचा कालावधी संपवून मैदानात सरावासाठी उतरला आहे. कर्णधार विराट इतर आरसीबी संघातील खेळाडूंना नुकताच भेटला असून या सर्व भेटीचा व्हिडीओ आरसीबीने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. यामध्ये विराट एकदम जोशात दिसत असून त्याने त्याचा सहकारी एबी डिव्हिलीयर्सची घेतलेली गळाभेट सर्वांचच मन जिंकत आहे.
विराट कोहली आधी इंग्लंडमध्ये पाचवी कसोटी खेळून मग युएईमध्ये आरसीबी संघासोबत जोडला जाणार होता. पण पाचवी कसोटी रद्द झाल्यामुळे विराट वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसोबत 12 सप्टेंबर रोजीच युएईत दाखल झाला. त्यानंतर सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपूवत तो मैदानात सरावासाठी उतरला आहे. आता पहिला सामना आरसीबी सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान विराट मैदानात परतला असून इतरही खेळाडू सरावासाठी मैदानात आहेत. यावेळी सर्वजण एकमेकांची भेट घेत असातानाचा, विराट उत्तम असा सराव करत असतानाचा एक व्हिडीओ आरसीबीने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
Bold Diaries: Virat Kohli joins the RCB team after quarantine
There were smiles, hugs and laughter in the RCB camp as captain Virat Kohli, Mohammed Siraj and some of our foreign players had their first hit in the nets.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/gxSEVf15rR
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 18, 2021
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. यासोबतच ते 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.
– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
– 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
– 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
– 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
– 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह
– 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
हे ही वाचा
T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार
IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी
(Virat kohli finishes quarantine period and joins nets practice hugs ab de villiers see video posted by RCB)