चंदीगड: भारत आणि श्रीलंकेत मोहालीमध्ये (Mohali Test) सुरु असलेला दुसरा कसोटी सामना विराट कोहलीसाठी खास आहे. कारण विराटच्या करीयरमधला हा 100 वा कसोटी सामना आहे. टीम इंडियाने आज मैदानावर एक वेगळी कृती करुन विराटसाठी हा सामना विशेष बनवला. भारतीय संघ आपला डाव घोषित करुन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला, त्यावेळी टीम इंडियाच्या (Team india) खेळाडूंनी कोहलीला गार्ड ऑफ ऑनर (guard of honour) दिला. भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला. रवींद्र जाडेजाने भारताकडून सर्वाधिक 175 धावा केल्या. डाव घोषित करुन भारतीय खेळाडू मैदानात फिल्डिंगसाठी उतरले. त्यावेळी आमने-सामने उभे राहून त्यांनी विराटला गार्ड ऑफ ऑनर दिला.
रोहित शर्माची गळाभेट घेतली
विराट कोहलीने मैदानात पळत एंट्री केली व गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्या सर्व खेळाडूंचे आभार मानले. विराट कोहलीने यानंतर कॅप्टन रोहित शर्माची गळाभेट घेतली व थँक्यू म्हटलं. विराट कोहलीला जेव्हा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, त्यावेळी संपूर्ण मैदानातील वातावरणात जोश निर्माण झाला होता. कोहली, कोहली, कोहली, चा जयघोष सुरु होता. कालही कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी विराट कोहलीला सन्मानित करण्यात आलं.
The smile on @imVkohli‘s face says it all.#TeamIndia give him a Guard of Honour on his landmark Test.#VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/Nwn8ReLNUV
— BCCI (@BCCI) March 5, 2022
स्वप्न पूर्ण होण्यासारखं
हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटला स्पेशल कॅप दिली होती. ज्यामध्ये विराटचं नाव आणि कसोटीचा क्रमांक होता. विराट सोबत यावेळी पत्नी अनुष्का शर्माही मैदानात होती. 100 वा कसोटी सामना खेळणारा विराट कोहली 12 वा भारतीय क्रिकेटपटू आहे. स्वप्न पूर्ण होण्यासारखं हा सन्मान असल्याचं विराटने म्हटलं. मी माझा डेब्यूच करतोय अशी माझी भावना होती, असं विराटने सांगितलं. विराटने या कसोटीच्या पहिल्या डावात 45 धावा केल्या.