एडिलेड: विराट कोहलीच T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये शानदार प्रदर्शन कायम आहे. विराट कोहलीने बांग्लादेश विरुद्ध शानदार अर्धशतक झळकावलं. विराटने नाबाद 64 धावा फटकावल्या. विराटच्या या इनिंगच्या बळावर टीम इंडियाने प्रथम बॅटिंग करताना 184 धावा फटकावल्या. विराटच्या या हाफ सेंच्युरीबद्दल जाणून घेऊया पाच मोठ्या गोष्टी.
16 वी धाव घेताच रेकॉर्ड
अर्धशतक झळकावताना विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कपमधला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. विराट कोहलीने 16 वी धाव घेताच हा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदला गेला. टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो टॉपवर आहे. महेला जयवर्धनेने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 1016 धावा केल्या आहेत. विराटने 23 व्या इनिंगमध्ये हा रेकॉर्ड मोडला.
विराटने कोणा विरुद्ध किती रन्स केल्या?
विराट कोहलीने टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं. विराटने पाकिस्तान विरुद्ध नाबाद 82 धावा केल्या होत्या. त्यानंतर नेदरलँड्स विरुद्ध त्याने 62 धावा फटकावल्या. आज बांग्लादेश विरुद्ध विराटने नाबाद 64 धावा केल्या.
राहुलसोबत महत्त्वाची पार्टनरशिप
विराट कोहली टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. विराटच्या 213 पेक्षा जास्त धावा होताच, त्याने नेदरलँड्सच्या ओडाऊडला मागे सोडलं. विराट कोहलीने केएल राहुलसोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी 37 चेंडूत 67 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा आणि राहुलने 21 चेंडूत आधी फक्त 11 धावा केल्या होत्या.