दुबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहात पाहिला गेला. भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला पण हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. सामन्यानंतर सोशल मीडियावर विविध मीम्स आणि दिग्गजांच्या कमेंट्स येतच होत्या. पण या सर्वातही कर्णधार कोहलीचा मोठेपणा सर्वांना पाहायला मिळाला.
पराभूत झाल्यानंतर कसलेही आढेवेढे न घेता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचं अभिनंदन केलं. तसेच पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मिठी मारली. विराट आणि रिझवानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान यावरचं माजी पाकिस्तानी कर्णधार सना मीरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तिच्या कॉलममध्ये लिहिलं आहे की, ‘विराट कोहलीने अतिशय शिष्टाईने पराभव स्वीकारत खेळ भावना दाखवली. त्याचं मी कौतुक करते. यातूनच त्याच्यातील ग्रेट प्लेयर दिसून येतो आणि पुनरागमन करण्याची ताकदही त्याच्यात असल्याचं दिसून येतं.’
व्हिडीओ पाहा
This. #INDvPAK #ViratKohli pic.twitter.com/tnjAYNO0BC
— Tavleen Singh Aroor (@Tavysingh) October 24, 2021
Spirit of Cricket!! ??? pic.twitter.com/pH6UfrRcKf
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 24, 2021
पाकिस्तानच्या विजयानंतर सना मीरने त्यांचा कर्णधार बाबरने संपूर्ण सामन्यात दाखवलेल्या वागणूकीचंही कौतुक केलं. या मोठ्या विजयानंतरही त्याने विजयाच्या उत्सवात आनंदी होण्यापेक्षा पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे मीरच्या मते अशा वागणूकीमुळे पाकिस्तान स्पर्धेतील आवडती टीम झाली आहे.
इतर बातम्या
‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग
India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ
(Virat kohli handled defeat with grace shows he is great player says Cricketer sana mir)