इंदूर | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याला 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या सामन्यातून 14 महिन्यांनी टी 20 मध्ये कमबॅक करत आहे. विराटला 14 महिन्यांच्या कमबॅकनंतर पहिल्याच मॅचमध्ये मोठा विक्रम करण्यासह पहिला भारतीय होण्याचा बहुमान मिळवण्याची संधी आहे.
विराटला इतिहास रचण्यासाठी 35 धावांची गरज आहे. विराटला टी 20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करण्यासाठी या 35 धावा हव्या आहेत. विराट 35 धावा करताच अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि एकूण चौथा फलंदाज ठरेल. टीम इंडियाकडून आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाही. विराटने 35 धावा केल्यास तो इतिहास रचेल.
दरम्यान विराटने आतापर्यंत 374 टी 20 सामन्यांमध्ये 41.40 च्या सरासरीने 11 हजार 965 धावा केल्या आहेत. विराटच्या आधी अशी कामगिरी फक्त 3 फलंदाजांनाच जमली आहे. यामध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड तर पाकिस्तानचा शोएब मलिक या 3 माजी फलंदाजांचा समावेश आहे.
ख्रिस गेल, 463 सामने, 14 हजार 562 धावा.
शोएब मलिक, 525 सामने, 12 हजार 993 धावा.
कायरन पोलार्ड, 639 सामने, 12 हजार 430 धावा.
विराट कोहली, 374 सामने, 11 हजार 965 धावा.
Preps ✅#TeamIndia READY for the 2⃣nd #INDvAFG T20I in Indore 👏 👏@IDFCFIRSTBank pic.twitter.com/CmZEs3d3io
— BCCI (@BCCI) January 13, 2024
दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्याआधी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. या सरावात टीम इंडियाचे जवळपास सर्वच खेळाडू होते. बीसीसीआयने या सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कॅप्टन रोहित, विराट कोहली यासह इतर खेळाडूही सराव करताना दिसत आहेत.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, संजू सॅमसन, तिलक वर्मा, कुलदीप यादव आणि आवेश खान.