Virat Kohli रुम घुसखोरी प्रकरणात क्राऊन पर्थ हॉटेलने उचललं मोठ पाऊल

| Updated on: Oct 31, 2022 | 3:33 PM

क्राऊन पर्थ हॉटेलने स्टेटमेंट जारी केलय. त्यात त्यांनी म्हटलय की....

Virat Kohli रुम घुसखोरी प्रकरणात क्राऊन पर्थ हॉटेलने उचललं मोठ पाऊल
virat-kohli
Image Credit source: AFP
Follow us on

पर्थ: टीम इंडियाचा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या हॉटेल रुममध्ये एका व्यक्तीने घुसखोरी केली. एका अनोळखी व्यक्तीने विराटच्या रुममध्ये प्रवेश करुन व्हिडिओ बनवला. त्यावेळी विराट कोहली रुममध्ये नव्हता. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विराटने या सर्व प्रकारावर नाराजी प्रगट केली. ही व्यक्तीगत जीवनात घुसखोरी असल्याचं विराटने म्हटलं. आता हॉटेलकडून या सर्व प्रकाराबद्दल स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. हॉटेलने विराटची माफी मागितलीय.

हॉटेलकडून स्टेटमेंट जारी

“आम्ही तात्काळ कारवाई केली आहे. जो व्यक्ती यामध्ये सहभागी होता, त्याला हटवलं आहे” असं क्राऊन पर्थ हॉटेलकडून सांगण्यात आलं. “आम्ही आमच्या पाहुण्याची माफी मागतो. क्राऊनने हा विषय सोडवण्यासाठी तात्काळ पावल उचलली आहेत. जी व्यक्ती सहभागी होती, त्याला हटवलं आहे. ओरिजनल व्हिडिओ सोशल मीडियावरुन डिलीट करण्यात येईल” असं सांगण्यात आलं आहे.

विराट शिवाय अजून कोणाची माफी मागितली?

या प्रकरणात आम्ही तिसऱ्या पार्टीकरवी चौकशी करतोय. “क्राऊन या प्रकरणात तिसऱ्या पार्टीकरवी तपास करत आहे. पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्न करु. आम्ही भारतीय क्रिकेट टीम आणि आयसीसीची माफी मागतो” असं हॉटेलने म्हटलंय.

विराटने काय म्हटलं?

चाहत्याच हे कृत्य म्हणजे व्यक्तीगत जीवनात ही घुसखोरी असल्याचं विराटने म्हटलं आहे. हा असा वेडपटपणा अजिबात पटलेला नाही हे विराट कोहलीने स्पष्ट केलय. “आवडत्या खेळाडूला पाहिल्यानंतर फॅन्सचं आनंदी होणं, त्याची उत्सुक्ता मी समजू शकतो. फॅन्स आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुक्त असतात, इथपर्यंत ठीक आहे. मी त्याच नेहमीच कौतुक केलय. पण हा व्हिडिओ धक्कादायक आहे” असं विराटने पोस्टमध्ये लिहिलय.

मग प्रायव्हसीची कुठे अपेक्षा करु?

“खासगी जीवनात हे अतिक्रमण आहे. मला माझ्या हॉटेल रुममध्ये प्रायव्हसी मिळणार नसेल, तर मग प्रायव्हसीची कुठे अपेक्षा करु?” असा सवाल विराटने केलाय. “हे मला पटलेलं नाही. लोकांच्या खासगी जीवनाचा आदर करा. मनोरंजनासाठी त्यांना वस्तू समजू नका” अशा शब्दात विराटने सुनावलय.