जसप्रीत बुमराहवर विराट कोहली याचिका दाखल करणार? हजारो फॅन्ससमोर केली घोषणा

| Updated on: Jul 05, 2024 | 3:01 PM

virat kohli on jasprit bumrah: टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट सहापेक्षा जास्त असतो. परंतु जसप्रीत बुमराहचा वर्ल्ड कप दरम्यान इकॉनॉमी रेट केवळ 4.17 राहिला. जसप्रीतने पाकिस्तानला 36 चेंडूत 40 धावा करु दिल्या नाही. त्यानंतर अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा करु दिल्या नाही.

जसप्रीत बुमराहवर विराट कोहली याचिका दाखल करणार? हजारो फॅन्ससमोर केली घोषणा
virat kohli jasprit bumrah
Follow us on

टी20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून भारतीय संघ मायदेशी परतला. भारतीय संघाचे मायदेशात प्रचंड स्वागत करण्यात आले. दिल्लीपासून मुंबईपर्यंत लाखोंच्या संख्येने भारतीय टीमचे चाहते रस्त्यावर उतरले. इंडिया, इंडियाच्या घोषणा देत होते. मुंबईत भारतीय संघाच्या खेळाडूंची विजयी रॅली निघाली. त्यानंतर खेळाडूंचा गौरव समारंभ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. त्यावेळी विराट कोहली याने जसप्रीत बुमराह याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याने बुमराह याला राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगत या संदर्भातील याचिकेवर सर्वात पहिली सही करण्याचे म्हटले.

बुमराहवर विराट नेमका काय म्हणाला?

टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट सहापेक्षा जास्त असतो. परंतु जसप्रीत बुमराहचा वर्ल्ड कप दरम्यान इकॉनॉमी रेट केवळ 4.17 राहिला. जसप्रीतने पाकिस्तानला 36 चेंडूत 40 धावा करु दिल्या नाही. त्यानंतर अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा करु दिल्या नाही. त्याची घातक गोलंदाजी पहिल्यावर विराटने जसप्रीतला राष्ट्रीय संपत्ती आणि जगातील आठवे आश्चर्य म्हटले. विराट म्हणाला, जेव्हा आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा हव्या होत्या, त्यावर विजेतेपद आपल्याकडून जाणार? अशी भीती वाटत होती. परंतु अंतिम सामन्यात जसप्रीतने कमाल केली. त्याने त्या पाच षटकांमध्ये जे करुन दाखवले, त्यावर विश्वास बसू शकत नाही.

हे सुद्धा वाचा

सर्वात पहिली सही माझी

होस्ट गौरव कपूर याने विराटला विचारले, जसप्रीतला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची याचिका दाखल केली जाईल. त्यावर तुम्ही सही करणार का? विराट म्हणाला, मी आताच पहिली सही करतो. फक्त बुमराहकडून त्यासाठी वेळ मागून घ्यावा. त्यावेळी विराटने सर्व दर्शकांना जसप्रीतसाठी टाळ्या वाजवण्याची विनंती केली. त्यानंतर संपूर्ण स्टेडियम टाळ्यांचा कडकडाट सुरु होता. संपूर्ण स्टेडियममध्ये बूम-बूम बुमराह घोषणा दिल्या जात होत्या.

जसप्रीत बुमराह कधी होणार?

जसप्रीत बुमराहनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले की, पहिल्यांदा सामना जिंकल्यानंतर तो २-३ वेळा रडला होता. त्याने त्याच्या निवृत्तीबद्दलही सांगितले. निवृत्त होण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्याने सांगितले. ही तर आता सुरुवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.