मुंबई : UAE मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. पण या टुर्नामेंट दरम्यान एक चांगली गोष्ट घडली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला त्याचा फॉर्म परत मिळाला. विराटने जवळपास महिन्याभरानंतर टीममध्ये पुनरागमन केलं होतं. या टुर्नामेंटमध्ये विराटच्या बॅटमधून धावांचा चांगलाच पाऊस पडला. त्याला त्याचा हरवलेला फॉर्म परत मिळाला.
विराट कोहली फॉर्ममध्ये परतला, ही टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. पण पाकिस्तानला मात्र त्याचा त्रास होतोय. त्यामुळेच पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू विराटने आता सन्यास घ्यावा, अशा पद्धतीची विधानं करतायत.
कोहली फॉर्ममध्ये परतला
कोहलीने 3 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 71व शतक झळकावलं. आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हे शतक झळकावलं. कोहलीच्या सेंच्युरीनंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. टी 20 मध्ये शतक झळकावण खूप कठीण असतं. त्यामुळेच कोहलीची सेंच्युरी खास आहे.
चांगलीच मिर्ची झोंबली
“टुर्नामेंटमध्ये कोहलीने नेहमीप्रमाणे पाकिस्तान विरुद्ध दमदार खेळ दाखवला. कोहलीच्या फॉर्ममुळे पाकिस्तानच्या दिग्गजांना चांगलीच मिर्ची झोंबली आहे. टी 20 फॉर्मेटमध्ये सेंच्युरी मारुन कोहली फॉर्ममध्ये परतलाय. आता तो निवृत्ती स्वीकारेल” असा त्यांचा कयास होता.
कोहलीने सन्यास घ्यावा, अख्तरची इच्छा
“कोहली टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतनंतर या फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. अन्य फॉर्मेटमध्ये दीर्घकाळ खेळण्यासाठी कोहली असा निर्णय घेऊ शकतो. मी त्याच्याजागी असतो, तर पुढचा विचार करुन निवृत्ती स्वीकारली असती” असं पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने इंडिया डॉट कॉमशी बोलताना म्हणाला. कोहलीने वर्कलोड आणि आपला फॉर्म पाहून हा निर्णय घ्यावा असं शोएबच म्हणणं आहे.
कोहलीच्या मागे लागले पाकिस्तानी खेळाडू
याआधी शाहिद आफ्रिदीने सुद्धा असच मत व्यक्त केलं. कोहलीने ड्रॉप होण्याआधी निवृत्ती घ्यावी, असं त्याने म्हटलं. “विराटला करीयरच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागला होता. पण त्यानंतर त्याने स्वत:ची ओळख बनवली. तो चॅम्पियन खेळाडू आहे. ड्रॉप होण्याआधी खेळाडूने रिटायरमेंट घेतली पाहिजे. करीयरच्या शिखरावर असताना खेळाडूची निवृत्ती फार कमीवेळा घडते” असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.