Virat Kohli | विराट कोहलीची सेंच्युरी थोडक्यात हुकली, पण त्या क्षणाला झाला दुसरा एक मोठा रेकॉर्ड

| Updated on: Oct 23, 2023 | 9:42 AM

Virat Kohli | विराटला सचिनत्या वनडेमधील शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करता आली नाही. पण त्या क्षणी कुठला दुसरा मोठा रेकॉर्ड झाला. विराट कोहलीकडे सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती.

Virat Kohli | विराट कोहलीची सेंच्युरी थोडक्यात हुकली, पण  त्या क्षणाला झाला दुसरा एक मोठा रेकॉर्ड
virat kohli ind vs nz
Follow us on

धर्मशाळा : वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये रविवारी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना झाला. जगभरातील कोट्यवधी भारतीय चाहत्यांनी हा सामना पाहण्याचा आनंद लुटला. तमाम क्रिकेट रसिकांच लक्ष या सामन्याकडे लागलं होतं. कारण वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडचा संघ दमदार कामगिरी करतोय. अनेक चाहत्यांच्या दृष्टीने हा सामना म्हणजे फायनल आधीची रंगीत तालिम होती. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा होताच. पण टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागलं होतं. टीम इंडियाने या सामन्यात अपेक्षित प्रदर्शन केलं. आरामात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला. यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पहिल्या चारही सामन्यात अशीच कामगिरी केलीय. अगदी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघांनाही आरामात धूळ चारलीय. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही त्याच कामगिरीच पुनरावृत्ती केली. सहज विजय मिळवला.

टीम इंडियाने हा सामना जिंकला असला, तरी कोट्यवधी क्रिकेट चाहते हळहळले. कारण या मॅचमध्ये किंग म्हणजे विराट कोहलीची सेंच्युरी पूर्ण होऊ शकली नाही. विराटने याआधीच्या सामन्यात बांग्लादेश विरुद्ध शतकी खेळी केली होती. तशीच संधी काल विराटला पुन्हा होती. न्यूझीलंड विरुद्धच त्याच हे शतक खास ठरलं असतं. कारण विराट कोहलीने हे शतक झळकवलं असतं, तर सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील सर्वाधिक शतकांशी बरोबरी झाली असती. पण दुर्देवाने कोहली 95 धावांवर बाद झाला. हेनरीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याने फिलिप्सकडे सोपा झेल दिला. विराट कोहलीने 104 चेंडूत 95 धावा केल्या. यात 8 फोर आणि 2 सिक्स आहेत.

विराटच शतक नाही, पण दुसरा कुठला मोठा रेकॉर्ड झाला?

विराट कोहलीची सेंच्युरी झाली नसली, तरी त्यावेळी दुसरा एक मोठा रेकॉर्ड झाला. हा रेकॉर्ड क्रिकेटच्या मैदानात नाही, तर (Disney+ Hotstar) डिजनी + हॉटस्टारवर झाला. सध्या डिजनी + हॉटस्टारवर वनडे वर्ल्ड कप 2023 च लाइव्ह स्ट्रीमिंग सुरु आहे. या सामन्याच लाइव्ह स्ट्रीमिंग सुरु असताना, प्रेक्षकसंख्येमध्ये एक नवीन रेकॉर्ड झाला. रविवारी 4 कोटी पेक्षा जास्त लोकांनी डिजनी + हॉटस्टारवर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आनंद लुटला. महत्त्वाच म्हणजे विराट कोहली सेंच्युरीच्या जवळ असताना डिजनी + हॉटस्टारची प्रेक्षकसंख्या सर्वोच्च शिखरावर होती. विराट सेंच्युरीच्या नजीक असताना 4.3 कोटी प्रेक्षक हा सामना पाहत होते. कारण वनडेमध्ये विराट सचिनच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करणार होता. याच वनडे वर्ल्ड कपमध्ये डिजनी + हॉटस्टारवर भारत-पाकिस्तान सामना 3.5 कोटी प्रेक्षकांनी पाहिला. हा रेकॉर्ड कालच्या सामन्याने मोडला गेला. विराटने काल शतक झळकावल असतं, तर वनडेमधील त्याची ही 49 वी सेंच्युरी ठरली असती.