ढाका: टीम इंडियाचा टॉप फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरला. अवघ्या एक रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराटला लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज स्पिनर तैजुल इस्लामने बाद केलं. विराटची इनिंग अवघ्या 5 चेंडूत संपली. तो 20 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. बांग्लादेशने सुरुवात चांगली केली. त्यांनी झटपट 3 विकेट घेतल्या. पण नंतर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला.
अवघ्या 1 रन्सवर विराटचा खेळ संपला
भारतीय क्रिकेट टीमने बांग्लादेश विरुद्ध सीरीजच्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची कमान केएल राहुलच्या हाती होती. रोहित शर्मा दुखापतीमुळे या कसोटी सामन्यात खेळत नाहीय. वनडे सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात तो खेळू शकला नाही. यजमान बांग्लादेशच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. 48 रन्समध्ये टीम इंडियाच्या 3 विकेट गेल्या. तैजुल इस्लामने पहिल्या सेशनमध्ये 2 विकेट घेतल्या. त्याने ओपनर शुभमन गिल आणि विराट कोहलीला बाद केलं. विराटने 5 चेंडूत 1 रन्स केला.
चेंडू पटकन टर्न झाला
विराटला पहिल्या डावात 20 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर तैजुलने lbw आऊट केलं. तैजुलच्या चेंडूचा योग्य अंदाज लावण्यात विराट चुकला. विराटच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोहलीला चेंडू डिफेंड करायचा होता. पण चेंडूला थोडी उसळी मिळाली. चेंडू टर्न होऊन पॅडला लागला. टीम इंडियाचा तिसरा विकेट 48 रन्सवर पडला. तैजुलने काढलेला हा दुसरा विकेट होता.
Back to back wicket for bangladesh..
Virat Kohli was only 99 runs away from the century ??#ViratKohli? #ViratKohli #indvsbang #INDvBAN #klrahul #TestCricket pic.twitter.com/smsRJhC4xL— Nikesh Gohite?? (@nikesh_gohite) December 14, 2022
पुजारा-अय्यरचा जबरदस्त खेळ
चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरने दमदार खेळ दाखवला. या दोघांच्या इनिंगच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 278 धावा केल्या आहेत. चटोग्रामच्या जहुर अहमद चौधरी स्टेडियमवर हा कसोटी सामना सुरु आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल या कसोटीत टीमच नेतृत्व करतोय.