मुंबई : 1983 च्या विश्वचषक विजय गाथेवर बनलेला ’83’ (83 Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कपिल देव यांच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग आहे. या चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची, तर दीपिका पदुकोण हिने कपिल देव यांच्या पत्नी रोमी देवची भूमिका साकारली आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. (Virat Kohli praised Ranveer Singh and director Kabir Khan after watching 83 Movie)
83 हा चित्रपट पाहिल्यानंतर विराट कोहलीने ट्विट करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोहलीने ट्विट केले आहे की, “भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगला अनुभवता आला नसता, एक काल्पनिकरित्या बनवलेला चित्रपट जो तुम्हाला 1983 च्या विश्वचषकातील घटना आणि भावनांमध्ये विसर्जित करतो, सर्वांची उत्कृष्ट कामगिरी..”
विराटने आपल्या ट्विटमध्ये रणवीर सिंगचेदेखील कौतुक केले आणि दिग्दर्शक कबीर खानला उत्तम चित्रपट बनवल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या. कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे.
Couldn’t have relived the most iconic moment of Indian cricket history in a better manner. A fantastically made movie which immerses you in the events and the emotion of the world cup in 1983. Splendid performances as well.
— Virat Kohli (@imVkohli) December 25, 2021
टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi shastri) काल एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे त्यांना इक्बाल, लगान, धोनी आणि 83 यापैकी एका चित्रपटाची निवड करण्यास सांगण्यात आले. तुमचा आवडता चित्रपट कोणता? असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर रवी शास्त्री यांनी क्षणाचाही विलंब न लावता 83 असे उत्तर दिले.
“’83’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी संघाचा एक भाग होतो, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं असं नाहीय, हा चित्रपट पाहून काही आठवणी ताज्या झाल्या, माझ्या डोळ्यात पाणी होते” असे रवी शास्त्री यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
@RanveerOfficial was a different level altogether. Great job everyone! @therealkapildev @kabirkhankk ?
— Virat Kohli (@imVkohli) December 25, 2021
“चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आणि कलाकारांचे त्यांनी कौतुक केले. रिअल लाईफ रील लाईफ मध्ये उतरवणं इतकं सोप नाहीय. त्यांनी खरोखरच खूप सुंदर काम केलय. पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी मनात ताज्या झाल्या. काही सीन्स पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊ पाहावा असा हा चित्रपट आहे” असे रवी शास्त्री यांनी सांगितले.
इतर बातम्या
83 The Film | रणवीर सिंह नाही तर कपिल देव यांच्या भुमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्याला होती पसंती!
’83’ Movie | कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी केली शेअर
83 Movie Review | कठोर परिश्रम, घाम अन् रक्तही गाळले, तेव्हा भारताला मिळाला 1983चा विश्वचषक!
(Virat Kohli praised Ranveer Singh and director Kabir Khan after watching 83 Movie)