मुंबई: टीम इंडिया आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला टी 20 सामना खेळणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला खास गिफ्ट मिळालं. सोमवारी प्रॅक्टिस सेशन संपल्यानंतर चाहत्याने विराटला गाठलं व गिफ्ट दिलं. टीम इंडिया मोहालीमध्ये आहे. प्रॅक्टिस सेशन संपवून विराट जात असताना, चाहत्याने त्याला गाठलं. विराटला त्याचच पोट्रेट चाहत्याने भेट म्हणून दिलं.
काय आहे त्या व्हिडिओमध्ये?
पंजाब क्रिकेट असोशिएशनने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय. टीम इंडिया प्रॅक्टिस सेशन संपवून साऊथ पॅव्हेलियनमधून निघत होती. केएल राहुल, उमेश यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, राहुल द्रविड, सूर्यकुमार यादव, राहुल द्रविड आणि अन्य खेळाडू या व्हिडिओमध्ये दिसतात.
फक्त कोहलीसाठी थांबला होता
चाहते विराट कोहलीची भेट घेण्यासाठी थांबले होते. कोहली थांबला व त्याने त्याच्या चाहत्यांची भेट घेतली. त्याचवेळी एका चाहत्याने विराटला त्याचं सुंदर पोट्रेट भेट म्हणून दिला.
Until the match ?? #IndvsAus #TeamIndia #India @imVkohli @HarshalPatel23 @Jaspritbumrah93 @BhuviOfficial @surya_14kumar @deepak_chahar9 @RishabhPant17 @akshar2026 @klrahul @hardikpandya7 @ImRo45 @yuzi_chahal @y_umesh @HoodaOnFire @surya_14kumar @DineshKarthik #1stT20I #IndvsAus pic.twitter.com/gKJDCb292c
— Punjab Cricket Association (@pcacricket) September 19, 2022
आजही शतकाची अपेक्षा
आजपासून सुरु होत असलेल्या मालिकेत विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. आशिया कपमधील सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात विराटने शतक झळकावले होते. अफगाणिस्तान विरुद्ध शतकी खेळी करुन त्याने शतकांचा दुष्काळ संपवला होता. विराटने त्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. आजही चाहत्यांना विराटकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे.