#ViratKohli: टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli resign) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने टि्वटवर पोस्ट करुन कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी (south Africa test) मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता. विराट कोहलीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अनेकांना हैराण करुन सोडणारा आहे. कारण भारतीय संघात सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र होतं. मग विराटने अचानक राजीनामा का दिला? असा प्रश्न निर्माण होतोय.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने पत्रकार परिषद घेतली होती. त्यात कर्णधारपदाच्या विषयावर त्याने भाष्य केलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला होता. टी-20, आणि वनडेची कॅप्टनशिप सोडू नको, असे आपण विराटला सांगितले होते. असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते. पण बीसीसाआयकडून कोणीही आपल्याला कॅप्टनशिप सोडताना अडवलं नाही असं विराटने सांगितलं. त्यामुळे विराट आणि सौरव यांच्या नेमकं खरं कोण बोलतय? असा प्रश्न निर्माण झाला होता.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
धोनीचे का आभार मानले?
विराटने राजीनामा देताना जे पत्र पोस्ट केलय, त्यात त्याने बीसीसीआय, संघ सहकारी, रवी शास्त्री यांच्याबरोबरीने एमएस धोनीचेही आभार मानले आहेत. कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तसेच भारतीय क्रिकेटला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची धोनीला माझ्यामध्ये जी क्षमता दिसली. त्या बद्दल धोनीचे मनापासून आभार, असे विराटने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
(virat kohli resigns from test captaincy thanks to ms dhoni in statement)