Virat Kohli Retirement Video : वर्ल्ड कप जिंकल्यावर किंग विराट कोहलीची निवृत्ती घोषणा

| Updated on: Jun 30, 2024 | 12:17 AM

Virat Kohli retirement : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला असून या सामन्यानंतर विराट कोहली टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Virat Kohli Retirement Video : वर्ल्ड कप जिंकल्यावर किंग विराट कोहलीची निवृत्ती घोषणा
virat Kohli retirement t20 cricket
Follow us on

T-20 वर्ल्ड कप फायनल सामन्यत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका संघावर 7 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने13 वर्षांनी टी-20 ट्रॉफीवर नाव कोरलं.  आजच्या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची जिगरबाज खेळी करत टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 176-7 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला 169-8 धावा करता आल्या. हा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

फायनल जिंकल्यानंतर ‘हा माझा शेवटचा टी-20 विश्वचषक होता, पराभव झाला असता तरी मी निवृत्ती जाहीर करणार होतो. पुढच्या पीढीच्या हातात जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी बराच वेळ लागला. कारण रोहितला नऊ वर्ल्ड कप वाट पाहावी लागली, माझा तर हा सहावाच वर्ल्ड कप होता. त्यामुळे या वर्ल्डकपसाठी खऱ्या अर्थाने पात्र होता, असं विराट कोहली म्हणाला.

विराट कोहलीने 12 जून 2010 ला टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. भारतासाठी 125 टी-20 सामने खेळताना 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 शतक आणि 38 अर्धशतके झळकवली आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कोहलीने 1292 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 15 अर्धशतके केली आहेत.

 

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह