मुंबई: टीम इंडियाने रविवारी तिसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवलं. या विजयासह टीम इंडियाने 2-1 ने मालिका जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी अर्धशतकं फटकावली. हे दोघे विकेटवर बॅटिंग करत असताना डगआऊट मधून कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड कोहलीला काहीतरी इशारा करत होते.
मॅच संपल्यानंतर सांगितलं….
कोहलीने मॅच संपल्यानंतर सांगितलं, ते असं का करत होते?. कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. तो आक्रमक फलंदाजी करत होता. रोहित आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार क्रीजवर आला.
त्याच्या स्टाइलने बॅटिंग करु दिली
त्याने कोहलीपेक्षा वेगाने धावा बनवल्या. त्यावेळी कोहलीने परिपक्वता दाखवली. त्याने सूर्यकुमारला त्याच्या स्टाइलने बॅटिंग करु दिली. स्वत: दुसऱ्याबाजूला शांत, संयमी फलंदाजी करत होता.
?️?️ I am enjoying my process at the moment: @imVkohli
Scorecard ▶️ https://t.co/xVrzo737YV #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/7JlLTyDj6y
— BCCI (@BCCI) September 25, 2022
रोहित- राहुलने काय सांगितलं?
सूर्यकुमार वेगाने धावा बनवत होता, त्यावेळी मी डगआऊटकडे बघितलं. तिथून रोहित-राहुलने कोहलीला आरामात फलंदाजी करायला सांगितलं. कारण दुसऱ्याबाजूने सूर्यकुमार आक्रमक फलंदाजी करत होता.
माझ्या अनुभवाचा वापर केला
“सूर्याने फटकेबाजी सुरु केल्यानंतर मी डगआऊटकडे बघितलं. रोहित आणि राहुल भाईंनी मला जसं चालू आहे, तशी फलंदाजी सुरु ठेवण्यास सांगितलं. कारण सूर्या वेगाने धावा बनवत होता. हा भागीदारीचा विषय होता. मी थोडा बहुत माझ्या अनुभवाचा वापर केला व खेळपट्टीवर उभा राहिलो” असं विराटने सांगितलं.
पाच चौकार आणि पाच षटकार लगावले
सूर्यकुमार 14 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर कोहलीने आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्याने पुढच्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सला सिक्स खेचला. सूर्यकुमारने त्याच्या इनिंगमध्ये 36 चेंडूत 69 धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले.
कोहली शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आऊट झाला. तो पर्यंत त्याने टीम इंडियाला विजयाच्या जवळ पोहोचवलं होतं. कोहलीने 48 चेंडूत 63 धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार आणि चार षटकार लगावले.