IND vs SA : तिसऱ्या कसोटीत विराट कोहली खेळणार का? कोच राहुल द्रविड म्हणाला…

| Updated on: Jan 07, 2022 | 11:03 AM

जोहान्सबर्गमधील पराभवानंतर टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी आहे. दोन्ही संघांमधील 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. म्हणजेच आता केपटाऊनमधील तिसरी कसोटी निर्णायक आणि रोमांचक ठरणार आहे.

IND vs SA : तिसऱ्या कसोटीत विराट कोहली खेळणार का? कोच राहुल द्रविड म्हणाला...
Virat Kohli - Rahul Dravid
Follow us on

डरबन : जोहान्सबर्गमधील पराभवानंतर टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी आहे. दोन्ही संघांमधील 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. म्हणजेच आता केपटाऊनमधील तिसरी कसोटी निर्णायक आणि रोमांचक ठरणार आहे. या निर्णायक सामन्यासाठी विराट कोहलीचेही महत्त्व वाढले आहे, ज्याने दुखापतीमुळे जोहान्सबर्ग कसोटीतून माघार घेतली होती. विराट कोहली कसोटी मालिकेतील अंतिम आणि निर्णायक लढतीत संघात कमबॅक करणार की नाही याबाबात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठी अपडेट दिली आहे. (Virat Kohli should return in Team India for Cape Town Test, Rahul Dravid give fitness updates)

जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत नियमित कर्णधार विराट कोहली संघाबाहेर झाल्यानंतर केएल राहुलने संघाची कमान हाती घेतली. हे राहुलचे कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली त्याला विजयाने सुरुवात करता आली नाही. जोहान्सबर्गमध्ये 240 धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आणि भारताने सामना 7 गडी राखून गमावला. या पराभवानंतर आता सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात संघात पुनरागमन करणार का?

विराट कोहलीच्या फिटनेसबाबत राहुल द्रविडकडून अपडेट

विराट कोहली आणि टीम इंडियाशी संबंधित या मोठ्या प्रश्नाचे उत्तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून जोहान्सबर्ग कसोटीनंतर मिळाले. त्याने विराट कोहलीची दुखापत आणि त्याच्या फिटनेसबाबत ताजे अपडेट्स दिले. राहुल द्रविड म्हणाला, “कोहली ज्या प्रकारे नेटमध्ये सराव करत आहे, त्यावरून तो फिट दिसत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, त्यांनी फिजिओशी अद्याप चर्चा केली नसली तरी, तो जे काही ऐकत आहे आणि त्याच्याशी बोलत आहे त्यावरून असे दिसतेय की भारतीय कसोटी कर्णधार फिट आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विराट कोहली पुनरागमन करताना दिसेल. हे द्रविडच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. असे झाल्यास हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावे लागेल.”

केपटाऊनचा इतिहास बदलणे गरजेचे!

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग हा टीम इंडियाचा बालेकिल्ला होता. यजमानांच्या हातून येथे 7 गडी राखून नुकत्याच झालेल्या पराभवापूर्वी भारतीय संघ या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेतील पहिली कसोटी मालिका जिंकणे टीम इंडियासाठी कठीण झाले आहे. वास्तविक, तिसरी कसोटी केपटाऊनमध्ये आहे, जिथे भारताचा रेकॉर्ड खराब आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या मागील 5 पैकी 3 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. 2 सामने ड्रॉ झाले आहेत. म्हणजेच येथे एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. याचाच अर्थ भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय मिळवायचा असेल तर टीम इंडियाला केपटाऊनचा इतिहास बदलावा लागणार आहे.

इतर बातम्या

IND VS SA: भारताने ‘या’ पाच चुकांमुळे गमावली जोहान्सबर्ग कसोटी

IND VS SA: एल्गरने करुन दाखवलं! दक्षिण आफ्रिकेचा भारतावर शानदार विजय

IND VS SA: जबरदस्त, बुमराह-शामीचे बॉल शेकले पण हार न मानता एल्गरने झळकावलं झुंजार अर्धशतक

(Virat Kohli should return in Team India for Cape Town Test, Rahul Dravid give fitness updates)