भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे विजयी भारतीय संघाचे देशात स्वागत करण्यासाठी तमाम क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहे. परंतु अंतिम सामना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजमध्ये धोकादायक चक्रीवादळ आले. यामुळे वेस्ट इंडिजला जाणारी आणि येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली होती. विराट कोहली याने विश्वविजेतपद पटकवल्यानंतर मैदानातूनच कुटुंबाशी संवाद साधला होता. त्याची मुलगी आणि पत्नीशी तो बोलत असतानाचे दृश्य त्यावेळी सर्वांनी पाहिली. आता वेस्ट इंडिजमधील चक्रीवादळाची भीषणता विराटने अनुष्का शर्माला दाखवली आहे. व्हिडिओ कॉल करुन वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेले वेगाने वाहणारे वारे दाखवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय संघ अजूनही बारबाडोसमध्येच अडकला आहे.
विराट कोहली आणि भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्ये अडकला आहे. चक्रीवादळामुळे हॉटेलमधून बाहेर पडणेही शक्य नाही. त्यामुळे खेळाडू गप्पांमध्ये आणि कुटुंबाशी संवाद साधण्यात वेळ घालवत आहेत. विराट कोहलीने अनिष्काला व्हिडिओ कॉल लावला. त्या माध्यमातून चक्रीवादळाची भीषणता तिला दाखवली. हॉटेलच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊन किती वेगाने वारे वाहत आहे, ते विराटने दाखवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर युजरच्या अनेक प्रतिक्रिया पडत आहेत.
भारतीय संघाने 29 जून रोजी बारबाडोसमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. रविवारी सामन्याचा राखीव दिवस ठेवण्यात आला होता. यामुळे टीम इंडियाचा परतण्याचा प्लॅन 30 जून रोजी रात्री ठेवण्यात आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजमध्ये बेरील हे चक्रीवादळ सुरु झाले. त्यामुळे भारतीय संघ आणि सहयोगी कर्मचारी वेस्ट इंडिजमध्येच अडकले आहेत.
Virat Kohli showing Hurricanes to Anushka Sharma on video call at Barbados. ❤️pic.twitter.com/PzZY3RmMMb
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 2, 2024
भारतीय टीम बारबाडोसमध्ये अडकली आहे. भारतीय संघाला परत आणण्यासाठी चार्टड प्लेन बीसीसीआय पाठवणार आहे. आता भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री ११ वाजता टीम इंडियाचे विमान वेस्ट इंडिजमधून भारतात निघण्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होणार आहे.