IND vs AUS: कसली कडक फिल्डिंग, Virat Kohli च्या डायरेक्ट थ्रो वर रनआऊट, पहा VIDEO

| Updated on: Oct 17, 2022 | 5:48 PM

IND vs AUS: अशी कडक फिल्डिंग प्रत्येकाने केली, तर टीम इंडियाचा वर्ल्ड कपचा मार्ग अजून सोपा होईल

IND vs AUS: कसली कडक फिल्डिंग, Virat Kohli च्या डायरेक्ट थ्रो वर रनआऊट, पहा VIDEO
Virat-Kohli
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) आज टी 20 वर्ल्ड कपआधी (T20 World cup) वॉर्म अप मॅच झाली. दोन्ही टीम्सचा खेळ पाहून ही वॉर्म अप मॅच आहे, असं वाटलच नाही. दोन्ही टीम्समधील खेळाडूंनी सरस प्रदर्शन केलं. अखेर भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला. या वॉर्मअप मॅचमध्ये (Warmup Match) आज क्रिकेट रसिकांना टी 20 क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळाला.

हा सामना ऑस्ट्रेलिया सहज जिंकणार असाच अंदाज अनेकांनी बांधला होता. पण शेवटच्या दोन षटकात टीम इंडियाने सामना फिरवला.

विजयात विराटच योगदान

आजच्या मॅचमध्ये केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी हे प्रामुख्याने चमकले. त्यांच्या सरस प्रदर्शनामुळे टीम इंडियाने मॅच जिंकली. पण या विजयात माजी कर्णधार विराट कोहलीने सुद्धा आपल्याबाजूने योगदान दिलं. आज विराट बॅटने विशेष कमाल करु शकला नाही.

विराटने क्रिकेट रसिकांच मन जिंकलं

विराटने आजच्या वॉर्म अप मॅचमध्ये 13 चेंडूत 19 धावा केल्या. पण फिल्डिंगमध्ये त्याने कमाल केली. लास्ट ओव्हरमध्ये पॅट कमिन्सचा लाँग ऑनला घेतलेला झेल तसंच टीम डेविडच्या रनआऊटने विराटने क्रिकेट रसिकांच मन जिंकलं.

चपळाईच्या बळावर कमाल

विराट कोहली टीम इंडियातील सर्वात फिट क्रिकेटपटू आहे. मैदानात त्याचा सळसळणार उत्साह लक्षवेधी असतो. आज मैदानावर त्याने याच चपळाईच्या बळावर कमाल केली.

विराटची अप्रतिम फिल्डिंग

हर्षल पटेल 19 वी ओव्हर टाकत होता. त्याने पहिल्या दोन ओव्हरमध्ये 12 पेक्षा जास्त धावा दिल्या. पण व्यक्तीगत तिसऱ्या षटकात त्याने चांगली गोलंदाजी केली. आधी त्याने दमदार फलंदाजी करणाऱ्या एरॉन फिंचला 76 धावांवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीच्या डायरेक्ट थ्रो मुळे टिम डेविडला पॅव्हेलियनची वाट पकडावी लागली. डेविडने फक्त 5 धावा केल्या. विराटने मैदानावर अप्रतिम फिल्डिंगचा नमुना दाखवला.