मैदानावर समोर पाहून कोहली त्यांच्याकडे धावला आणि पायाला केले स्पर्श, कोण आहेत राजकुमार शर्मा?

| Updated on: May 07, 2023 | 1:29 PM

विराट कोहली याचा आक्रमक अंदान सगळ्यांनीच पाहिला आहे. पण त्याचा हा आगळा वेगळा स्वभाव कोणी पाहिला नसेल. विराह कोहलीने त्यांना पाहताच त्यांच्याकडे धावत गेला.

मैदानावर समोर पाहून कोहली त्यांच्याकडे धावला आणि पायाला केले स्पर्श, कोण आहेत राजकुमार शर्मा?
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( IPL 2023 ) दमदार फलंदाजी करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना विराटने 10 सामन्यात 6 अर्धशतक ठोकली आहेत. आतापर्यंत त्याने एकूण 419 धावा केल्या आहेत. विराट केवळ त्याच्या खेळामुळेच नव्हे तर मैदानावरील खेळाडूंसोबतच्या वादामुळेही चर्चेत असतो. लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यासोबत विराट कोहलीची बाचाबाची देखील झाली. त्यामुळेही तो चर्चेत होता. पण विराट कोहलीचं एक वेगळं रुप ही पाहायला मिळालं आहे.

कोहलीच्या या कृतीने जिंकलं अनेकांचं मन

विराट कोहली ( Virat Kohli ) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळत असताना सामन्यापूर्वी विराट कोहली त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना जावून भेटला. आपल्या गुरूला पाहताच विराटने प्रथम त्याच्या पायाला स्पर्श केला. विराट कोहलीच्या या कृतीने अनेकांचं मन जिंकलं. विराट कोहली नेहमीच मैदानावर खूपच अॅग्रेसिव्ह असतो. पण आपल्या गुरुंबद्दल त्याने दाखवलेली कृतज्ञता ही देखील तितकीच चर्चेत राहिली.

विराट कोहलीची ओळख त्याची आक्रमकता आहे. आपल्या वरिष्ठ खेळाडूंचा तो आदर करत नाही, असा आरोप नेहमीच त्याच्यावर होतो. मात्र तो ज्या पद्धतीने त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांना भेटला आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. त्यावरुन त्याचं आणखी एक रुप त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळालं.

कोण आहेत राजकुमार शर्मा

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राजकुमार शर्मा ( Rajkumar Sharma ) यांची दिल्लीच स्वतःची क्रिकेट अकादमी आहे. 1998 मध्ये त्यांनी हे याची सुरुवात केली होती. ज्यामध्ये विराट कोहली देखील क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्यासाठी जात होता. विराट कोहलीने राजकुमार शर्मा यांच्या अकादमीपासून क्रिकेट प्रशिक्षणाची सुरुवात केली.

राजकुमार शर्मा यांनी 1986 ते 1991 दरम्यान फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. ते फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज होते. 2016 मध्ये त्यांना त्यांनी क्रिकेटमधील दिलेल्या योगदानासाठी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.