कोलकाता : लखनऊ सुपर जायंट्सची टीम काल थोडक्यात वाचली. कोलकाता नाइट रायडर्सची टीम काल जिंकता, जिंकता हरली. काल नशीब KKR सोबत नव्हतं. त्याचा फायदा लखनऊला मिळाला व ते 1 रन्सने मॅच जिंकले. या विजयासह लखनऊने IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. या विजयानंतर लखनऊची टीम पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. विजयानंतर विराट कोहलीला नडणारा लखनऊचा गोलंदाज नवीन उल हकने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेयर केलाय. त्यात त्याने तूच देव आहेस, असं म्हटलय.
नवीन उल हक KKR विरुद्ध पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 46 धावा दिल्या. नवीनच्या गोलंदाजीवर रिंकू सिंहने चौफेर फटकेबाजी केली. लखनऊच्या हातातून सामना निसटलाच होता.
लखनऊसाठी संकटमोचक कोण ठरलं?
नवीन धावा रोखू शकला नाही, ना विकेट काढू शकला. लखनऊने मॅच हरली असती, तर नवीन उल हक मोठा विलन ठरला असता. पण रवी बिश्नोईने नवीनला वाचवलं. रवी बिश्नोईने ज्या पद्धतीची बॉलिंग आणि फिल्डिंग केली, ते लखनऊच्या विजयाच प्रमुख कारण ठरलं. रवीने धावा रोखल्याच पण महत्वाच्या क्षणी विकेट काढले. त्याने फक्त लखनऊचा पराभवच टाळला नाही, तर नवीनला सुद्धा वाचवलं.
म्हणून नवीन उल हक त्याला देव म्हणाला
विजयानंतर नवीनने रवी बिश्नोईचा फोटो शेयर केला. त्यामध्ये त्याने रवी बिश्नोईला ‘तूच देव आहेस’, असं म्हटलय. बिश्नोईने आधी व्यकंटेश अय्यरची कॅच पकडली. त्याची तुफानी बॅटिंग 24 धावांवरच रोखली. त्यानंतर कॅप्टन नितीश राणाला आऊट केलं. त्याने 8 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. बिश्नोईने 10 रन्सवर रहमानुल्लाह गुरबाजची कॅच घेतली. त्यानंतर आपल्याच गोलंदाजीवर आंद्रे रसेलला 7 रन्सवर बोल्ड केलं. रवी बिश्नोईने 4 ओव्हरमध्ये 23 रन्स देऊन 2 विकेट काढले.
सोशल मीडियावरुन साधला निशाणा
1 मे रोजी RCB विरुद्ध LSG सामना झालेला. या मॅचमध्ये नवीन उल हकने विराट कोहली बरोबर वाद घातलेला. गौतम गंभीर आणि विराट कोहलीमध्ये सुद्धा वादावादी झालेली. त्यानंतर नवीनने सोशल मीडियावर कोहलीला लक्ष्य केलं होतं. कोहली बरोबर वाद घातल्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरला. पण पावसामुळे मॅच रद्द झाली होती.
Rinku Singh hain inka naam?, namumkin nahin inke liye koi kaam ? #KKRvLSG #IPLonJioCinema #TATAIPL #EveryGameMatters | @KKRiders pic.twitter.com/2YbgkciPW5
— JioCinema (@JioCinema) May 20, 2023
त्यानंतर तो टीमच्या बाहेर गेला. टीमच्या बाहेर होण्याआधी तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. मुंबई इंडियन्स आणि KKR विरुद्धच्या सामन्यात त्याला एकाही मॅचमध्ये यश मिळालं नाही.