मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) या दोघांची क्रिकेट विश्वात तुलना केली जात आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यावर त्याचं मत व्यक्त केलं आहे. शोएब म्हणाला की, या दोन खेळाडूंमध्ये तुलना केली जात असली तरी ती चुकीची आहे. 70 आंतरराष्ट्रीय शतकांसह विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याचबरोबर, बाबर आझमदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. शोएब म्हणाला की, बाबर नक्कीच या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासह तो फॅब फाईव्हमध्येही गणला जाऊ शकतो. (Virat Kohli will break Sachin Tendulkar 100 Century world record in the next five years : Shoaib Akhtar)
बाबर उत्तम खेळाडू असला तरी, आत्ता त्याची विराट कोहलीसोबत तुलना होऊ शकत नाही. या दोन फलंदाजांमधील फरक खूप जास्त आहे. येत्या पाच वर्षात कोहली आणखी 30 शतके ठोकेल, असा अंदाज अख्तरने व्यक्त केला आहे. तो म्हणाला की कोहली 110 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम करु शकेल. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 100 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. अख्तर म्हणाला की, कोहली सचिनचा विक्रम मोडीत काढेल.
अख्तर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला की, “विराटकडे काय आहे… तर त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 70 शतके आहेत. पुढील पाच वर्षांत तो आणखी 30 शतके ठोकणार आहे. त्याने 120 शतके किंवा किमान 110 शतके करावी, अशी माझी इच्छा आहे. दुसऱ्या बाजूला बाबर कोहलीपेक्षा सात वर्षांनी लहान असून त्याने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली आहे. त्यामुळे दोघांच्या आकडेवारीत खूप मोठा फरक आहे. त्यामुळे आत्ता या दोन खेळाडूंमध्ये तुलना केली जाऊ शकत नाही.
कोहलीचा हा शानदार विक्रम मोडण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला पुढील काही वर्षांत शानदार फलंदाजीची गरज भासणार असल्याचे अख्तरला वाटते. पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वात मोठा फलंदाज म्हणून बाबरचं कौतुक केलं जाऊ शकतं. असं अख्तरला वाटतं. पण कोहलीपेक्षा तो अधिक चांगली कामगिरी करू शकतो की नाही, याचा निर्णय पुढील दहा वर्षांनंतर घेता येईल.
इतर बातम्या
IND vs SL : आयपीएलमधील कोट्याधीश, वयाच्या 32 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण
IND vs SL : श्रीलंका संघाविरुद्ध 5 खेळाडूंनी केला डेब्यू, 40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती
(Virat Kohli will break Sachin Tendulkar 100 Century world record in the next five years : Shoaib Akhtar)