IND vs ENG : तिसऱ्या कसोटीसाठी विराटची नवी रणनीती, संघात दोन बदल, अशी असू शकते अंतिम 11

| Updated on: Aug 24, 2021 | 5:51 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यानंतर भारताने लॉर्ड्सवरील सामना जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीसाठी विराटची नवी रणनीती, संघात दोन बदल, अशी असू शकते अंतिम 11
भारतीय संघ
Follow us on

लंडन : भारताने (India) कसोटी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतल्याने आता ही आघाडी अजून वाढवण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) सज्ज झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीमध्ये जिंकण्यासाठी भारत अधिक प्रयत्न करणार असून त्यासाठी नवी रणनीती तयार करण्यात येत आहे. या रणनीतीनुसार संघात दोन बदल होण्याची दाट शक्यता आहे. तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले (Headingley) येथे उद्यापासून (25 ऑगस्ट) सुरु होणार आहे.

संघात होऊ शकणारे दोन्ही बदल हे मधल्या फळीतील फलंदाजीसह गोलंदाजीत दिसू शकतात. त्यामुळे वरच्या फळीतील फलंदाजी पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच असू शकते. यावेळी संघात सर्वात मोठा बदल म्हणजे रवींद्र जाडेजाच्या (Ravindra jadeja) जागी आर अश्विनला (R Ashwin) संघात स्थान दिलं जाऊ शकतं. कारण कसोटी क्रिकेटचा विषय येताच भारताचा प्रमुख खेळाडू म्हणून आर अश्विनचे नाव समोर येते. जगातील सध्याचा अव्वल क्रमाकांचा फिरकीपटू आणि एक विश्वासू फलंदाज असणारा आश्विन पहिल्या दोन कसोटी सामन्यांत संघात नव्हता. त्यानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आश्विनला संघात घेण्याबाबत भाष्य केलं. तसेच जाडेजा पहिल्या दोन्ही सामन्यात एकही विकेट घेऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी आश्विनला संधी मिळू शकते.

शार्दुलचे पुनरागमनही जवळपास निश्चित

आश्विन आणि जाडेजानंतर संघात बदल म्हणून शार्दूल ठाकूर याला संघात स्थान दिले जाऊ शकते. एक अष्टपैलू खेळाडूची भारतीय संघाला कायमच गरज असते. दरम्यान दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात संघात नसणारा शार्दूल आता फिट झाल्यामुळे त्याला संघात संधी दिली जाऊ शकते. शार्दूलने ऑस्ट्रेलिया दौैऱ्यातही उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीत इशांत शर्माच्या जागी खेळवलं जाऊ शकतं.

तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य अंतिम 11

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), ऋषभ पंत, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

इतर बातम्या

IND vs ENG : इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, आणखी एक खेळाडू तिसऱ्या कसोटीला मुकणार, गोलंदाजी विभागाच्या अडचणी वाढल्या

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर दोन खेळाडूंची एकत्र निवृत्ती, दोघेही दिग्गज फलंदाज

(Virat kohli will to two changes in team india this could be playing 11 for third test against england)