टीम इंडियात (Team India Captain change) मोठी खांदेपालट झालीय. वन डेत रेकॉर्ड चांगलं असूनही विराट कोहलीला हटवलं गेलंय. त्यावर सोशल मीडियावर वाद विवाद झडतायत. पण रोहीत की विराट? दोघांपैकी वन डे आणि टी-20 लीड कुणी करायचं हे बीसीसीआयनं (BCCI) नेमकं कसं ठरवलं? ह्या प्रश्नाचं उत्तर अनेक जण अनेक पद्धतीनं शोधतायत. पण इंडियन एक्स्प्रेसला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं एक मुलाखत दिलीय. ह्या मुलाखतीत त्यानं व्हॉईट बॉल आणि रेड बॉलचा फॉर्म्युला सांगितलाय. क्रिकेटमध्ये जसा टॉस असतो, तसाच काही रेड-व्हॉईटचा टॉस झालेला दिसतोय. विशेष म्हणजे टी-20 चं कर्णधारपद सोडू नको अशी विनंती विराट कोहलीला केली होती हेही गांगुलीनं पहिल्यांदाच सांगितलंय. म्हणजेच टी-20 ची कॅप्टन्सी सोडली, त्यातच त्याचं वन डेची कॅप्टन्सी जाणार हे निश्चित झाल्याचं दिसतंय. कमीत कमी सौरव गांगुली जे फॉर्म्युला सांगतायत, तो विराटच्या लक्षात नव्हता की काय असा सवालही निर्माण होतो.
काय आहे तो फॉर्म्युला?
विराट कोहलीला हटवून रोहीत शर्माकडे वन डे आणि टी-20 चं कर्णधारपद देण्यात आलंय. विशेष म्हणजे विराट कोहली वन डेची कॅप्टन्सी सोडायला तयार नव्हता तर त्याला हटवलं गेल्याचीही चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर गांगुली म्हणतो- आम्ही विराटला टी-20 चं कॅप्टन्सी सोडू नको अशी विनंती केली होती. ती बदलण्याचा कुठलाही प्लॅन नव्हता. पण विराटनं तरीही टी 20 चं कर्णधारपद सोडलं. मग सलेक्टर्सनी लिमिटेड ओव्हर्सची कॅप्टन्सी न विभागण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी पूर्ण सेप्रेशन केलं. गांगुली पुढं असही म्हणतो- बॉटम लाईन हीच आहे की- व्हाईट बॉल क्रिकेटसाठी दोन कॅप्टन असू शकत नाहीत.
दोन पॉवर सेंटरनं वाद वाढणार?
व्हॉईट बॉल मॅचेससाठी म्हणजेच टी 20 आणि वन डे साठी दोन वेगवेगळे कॅप्टन निवडले असते तर, दोन पॉवर सेंटर निर्माण झाले असते आणि त्यानं वाद वाढला असता का? असा सवाल गांगुलीला विचारला गेला त्यावेळेस त्याचं उत्तर त्यानं नेगेटीव्ह दिलं. तो म्हणतो, आपल्याकडे वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार अशी परंपरा नाही. ती इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात आहे. पण व्हाईट बॉलसाठी एक आणि रेड बॉलसाठी वेगळा असं आपण आतापर्यंत केलेलं आहे. जेव्हा कोहली दोन वर्षे टेस्ट टीमची कॅप्टन्सी करत होता तर धोनी हा लिमिटेड ओव्हर्सची. आताही तोच फॉर्म्युला पाळला गेलाय.
कोहली काय म्हणाला होता?
बीसीसीआयच्या विनंती नंतरही कोहलीनं टी-20 नेतृत्व सोडणं त्याला महागात पडल्याचं दिसतंय? आपल्याला वन डेचा कॅप्टन म्हणून हटवला जाणार नाही अशीच त्याची धारणा असावी. कारण जेव्हा त्यानं टी-20 ची कॅप्टन्सी सोडली त्यावेळेस त्यानं वन डेचं नेतृत्व करणार अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली होती. कोहली म्हणाला होता- वर्कलोड समजणं खूप महत्वाचं आहे. मी गेल्या 8-9 वर्षापासून क्रिकेटचे तीनही फॉरमॅटमध्ये खेळतोय तसच पाच सहा वर्षापासून कॅप्टन्सीही करतोय. त्याचा लोड खुप जास्त आहे. टेस्ट आणि वन डे मध्ये लीड करण्यासाठी मी टी-20 ची कॅप्टन्सी सोडतोय.
कोहलीचा रेकॉर्ड घसरतोय?
कोहली हा व्हाईट बॉल्स सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. तसं रेकॉर्ड तरी दिसतो. 95 वन डे मध्ये त्यानं 65 मध्ये विजय मिळवून दिलाय. तर 45 टी-20 पैकी त्यानं 27 सामन्यात टीम इंडियाला विजयी केलंय. पण गेल्या दोन वर्षापासून त्याचा बॅटींगला ग्रहण लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच कदाचित त्यानं टी 20 चं कर्णधारपद सोडलं असावं. गेल्या दोन वर्षात त्यानं फक्त 520 रन्स जमवल्यात, त्यासाठी तो 12 वन डे खेळलाय. पण एकही शतक लगावता आलेलं नाही. टी-20 आणि टेस्टमध्येही त्याला काही खास अशी कामगिरी करता आलेली नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोहलीला हटवण्यात आल्याचं दिसतंय.
हे सुद्धा वाचा:
Pimpri-chinchawad crime |शहरात पिस्तुल परवान्यांसाठी ‘भाऊ’ , ‘दादा’, ‘मामांची चढाओढ
Nitesh Rane | संजय राऊतांच्या जीभेचं संशोधन झालं पाहिजे : नितेश राणे
कधी नव्हे ते सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ, आता वाढीव उत्पादनासाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!