नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये दिनेश कार्तिककडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. आधी पाकिस्तान त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिनेश कार्तिक फ्लॉप ठरला. पर्थमध्ये बॅटिंग करताना कार्तिक हैराण झाला. त्याने 15 चेंडूत फक्त 6 धावा केल्या. कार्तिकला या मॅचमध्ये दुखापत झाली. पुढच्या मॅचमध्ये त्याचं खेळणं कठीण आहे. दरम्यान दिनेश कार्तिकबद्दल विरेंद्र सेहवागने एक विधान केलय. “ऑस्ट्रेलियन विकेट्सवर ऋषभ पंतपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. दीपक हुड्डाच्या जागी पंतला संधी दिली असती, तर त्याने अधिक चांगली कामगिरी केली असती” असं सेहवागच मत आहे.
सेहवागने काय म्हटलं?
“पहिल्या दिवसापासून पंत टीममध्ये हवा होता. तो तिथे टेस्ट क्रिकेट खेळलाय. वनडे मॅचेस खेळलाय. त्याने परफॉर्म केलय. दिनेश कार्तिक ऑस्ट्रेलियात कधी खेळला? ही काही बँगलोरची विकेट नाही. आज हुड्डाच्या जागी पंतला खेळवायला पाहिजे होतं. त्याला तिथे खेळण्याचा अनुभव आहे. त्याने गाबाची घमेंड मोडली आहे. मी फक्त सल्ला देऊ शकतो. बाकी सर्व मॅनेजमेंटच्या हातात आहे” असं सेहवाग क्रीकबजशी बोलताना म्हणाला.
ऑस्ट्रेलियात पंतचा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियात ऋषभ पंतचा टेस्ट रेकॉर्ड कमालीचा आहे. त्याने तिथे 7 सामन्यात 62 पेक्षा जास्त सरासरीने 624 धावा ठोकल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतक आहेत. टी 20 मध्ये त्याने दोन इनिंगमध्ये फक्त 20 धावाच केल्यात. पंतच टी 20 फॉर्मेटमधील प्रदर्शन त्याची कमकुवत बाजू आहे. त्यामुळेच तो प्लेइंग इलेव्हन बाहेर आहे.
कार्तिकच्या दुखापतीमुळे पंतला संधी?
दिनेश कार्तिकला दुखापत झालीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याला लोअर बॅकला दुखापत झाली. त्यामुळे कार्तिकच्या जागी आता बांग्लादेश विरुद्ध पंतला संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. भारतीय टीम बुधवारी बांग्लादेश विरुद्ध पुढची मॅच खेळणार आहे. एडिलेडमध्ये हा सामना होईल. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे. लीगमधील भारताचा शेवटचा सामना रविवारी झिम्बाब्वे विरुद्ध आहे.