Lionel Messi भारतात जन्मला असता, तर? वर्ल्ड कप विजयानंतर त्याला काय मिळालं असतं?

| Updated on: Dec 20, 2022 | 4:17 PM

विरेंद्र सेहवागने शेअर केला मजेदार मीम, लिंकवर क्लिक करुन तुम्हीच पहा.

Lionel Messi भारतात जन्मला असता, तर? वर्ल्ड कप विजयानंतर त्याला काय मिळालं असतं?
Lionel messi
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग त्याच्या वेगळ्या सेंस ऑफ ह्यूमरसाठी ओळखला जातो. रविवारी फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला. लियोनल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या या विजयानंतर विरेंद्र सेहवाने एक शानदार टि्वट केलं होतं. सोबतच त्याने अर्जेंटिनाला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. सेहवागने आता इन्स्टाग्रामवर मेस्सीशी संबंधित एक गंमतीशीर मीम शेअर केलाय.

मेस्सीचा हा कितवा वर्ल्ड कप होता?

मेस्सीने अर्जेंटिनाचा 36 वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. अर्जेंटिनाला वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळवून दिली. तो अर्जेंटिनाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने या अभियानात सात गोल डागले. प्रत्येक मॅचमध्ये आपल्या टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाचवा वर्ल्ड कप खेळणाऱ्या मेस्सीने अर्जेंटिनाच्या टीमच नेतृत्व केलं. कतारच्या लुसैल स्टेडियमवर फायनल झाली. तिथे डिफेंडिंग चॅम्पियन फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असं हरवलं.

काही वेळात पोस्ट व्हायरल

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दुसऱ्यादिवशी विरेंद्र सेहवागने इन्स्टाग्रामवर मेस्सीबद्दलच गंमतीशीर पोस्ट शेअर केलीय. लियोनल मेस्सी भारतात जन्मला असता, तर शानदार वर्ल्ड कप विजयानंतर त्याला कशा पद्धतीने पुरस्कृत केलं असतं, त्याबद्दल सेहवागने पोस्ट शेअर केलीय. ही पोस्ट काही वेळात त्याच्या फॉलोअर्समध्ये व्हायरल झालीय. या पोस्टला अनुभवी ओपनर शिखर धवनने लाइक केलय.


सेहवागने टि्वटमध्ये काय म्हटलय?

याआधी सेहवागने फिफा वर्ल्ड कप 2002 फायनलमधील मेस्सी आणि एम्बाप्पेच्या शानदार प्रदर्शनाच कौतुक केलं होतं. “आतापर्यंतच्या सर्वोत्तम वर्ल्ड कप मॅचपैकी एक. एम्बाप्पे फ्रान्ससाठी उत्कृष्ट खेळला. लियोनल मेस्सीसाठी सुद्धा हा महत्त्वाचा क्षण होता. फिफा वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाला शुभेच्छा” असं सेहवागने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.


मेस्सी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

रविवारी फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असं हरवलं. फुल टाइममध्ये स्कोर 2-2 असा बरोबरीत होता. एक्स्ट्रा टाइममध्ये स्कोर 3-3 असा झाला. मेस्सीने फायनलमध्ये सर्वोत्तम खेळ केला. त्याने दोन गोल केले. मेस्सीने या वर्ल्ड कपमध्ये एकूण सात गोल केले. वर्ल्ड कपमध्ये त्याच्या एकूण गोल्सची संख्या 13 झाली. मेस्सी अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनलाय.