चेन्नई : IPL 2023 मध्ये बुधवारी रात्री मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर आरामात विजय मिळवला. हा एलिमिनेटरचा सामना होता. त्यामुळे पराभूत टीमच टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात येणार होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी विजय मिळवला. मुंबईने पहिली बॅटिंग केली. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 182 धावा केल्या. आकाश मधवालने जबरदस्त स्पेल टाकला. 3.3 ओव्ह्रसमध्ये 5 धावा देत त्याने 5 विकेट काढल्या. लखनऊ सुपर जायंट्सचा डाव 101 धावांवर आटोपला.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने कृणाल पांड्यच्या लखनऊवर इतका शानदार विजय मिळवला. पण मुंबईच्या या विजयात वीरेंद्र सेहवागला एक गोष्ट खटकली. या माजी क्रिकेटपटूला रोहितचा एक निर्णय पटला नाही. त्याने थेट या बद्दल आपली मनातली नाराजी बोलून दाखवली.
सेहवागला रोहितचा कुठला निर्णय चुकीचा वाटला?
पावरप्लेच्या लास्ट ओव्हरमध्ये रोहित शर्माने चेंडू ऋतिक शौकीनच्या हाती दिला. ऋतिक शौकीनकडे इतका अनुभव नाहीय. समोर मार्कस स्टॉयनिस होता. या सीजनमध्ये स्टॉयनिस जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबईच्या या युवा गोलंदाजाच्या बॉलिगंवर हल्ला चढवला. स्टॉयनिसने ऋतिक शौकीनच्या ओव्हरमधये दोन फोर आणि एक सिक्स मारला. ऋतिकने त्या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या व तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला नाही.
सेहवाग काय म्हणाला?
वीरेंद्र सेहवागच्या मते, ऋतिक शौकीनला ओव्हर देण्याचा रोहित शर्माचा निर्णय चुकीचा होता. “तुम्हाला त्याच्या ओव्हर्स पावरप्लेनंतर राखून ठेवता आल्या असत्या. मला रोहितचा निर्णय पटला नाही. ऋतिक एक तरुण गोलंदाज आहे. समोर स्टॉयनिस सारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. तो क्रीजवर सेट झालाय व बॉलर्सचा टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही शौकीनला सहावी ओव्हर दिली व स्टॉयनिस हल्लाबोल केला. लेफ्टी फलंदाज खेळपट्टीवर आहे, हा विचार करुन तुम्ही स्पिनरला बॉलिंग दिली, हे मी समजू शकतो. पण तुमच्याकडे इनफॉर्म बॉलर पियुष चावला आहे. ज्याने या सीजनमध्ये विकेट घेतल्या आहेत. तुम्ही त्याला ओव्हर देऊ शकला असता” असं सेहवाग क्रीकबजशी बोलताना म्हणाला.
नशिबाने कृणालचा फटका चुकला
“दुसऱ्या कुठल्या बॉलरने 6 व्या ओव्हरमध्ये 6 ते 8 धावा दिल्या असत्या. त्या ओव्हरमध्ये लखनऊवरचा दबाव कमी झाला. नशिबाने स्ट्रॅटजिक टाइमआऊट नंतर कृणाला पांड्याचा फटका चुकला व तो बाद झाला. मला असं वाटत रोहित तिथे चुकला, त्याने ती ओव्हर शौकीनला द्यायला नको होती. त्याला पावरप्लेनंतर गोलंदाजी देता आली असती. कारण सहा ओव्हर्सनंतर फिल्डर्स रिंगणाबाहेर जातात” असं सेहवाग म्हणाला.