मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सुपरस्टार फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 10 जुलै 1949 रोजी गावस्कर यांचा बॉम्बे (आता मुंबई) येथे जन्म झाला होता. अनेक वर्षे भारतीय फलंदाजीची मदार खांद्यावर पेलणाऱ्या गावस्करांवर आज सर्वचजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण या सर्वांमध्ये वीरेंद्र सेहवागने थोड्या हटके शुभेच्छा देत गावस्करांना बर्थडे विश केलं आहे. सेहवागने गावस्करांच्याच एका कॉमेन्ट्रीच्या व्हिडीओतील छोटासा भाग पोस्ट करत त्याला एक हटके कॅप्शन दिलं आहे.
सेहवागने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये गावस्कर एका सामन्यादरम्यान कॉमेन्ट्री करताना कोणतातरी संदर्भ देत ‘मला तुमच्याशी काही बोलायचं नाही चल फुट इथून’ असा अस्सल मुंबईच्या बोलीत बोलत आहेत. सेहवागने नेमका हाच भाग पोस्ट करत अशाचप्रकारे गावस्कारांना बाद करु पाहणाऱ्या गोलंदाजाना ते ‘चल फुट’ करत असं सेहवागने लिहिलं आहे. सोबतच महान दिग्गज सुनील गावस्करांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अशी फटकेबाजी करत राहा अशा शुभेच्छाही सेहवागने दिल्या आहेत.
Chal Phut. This is what the great #SunilGavaskar said to bowlers trying their best to get him out.
Happy Birthday to the legend, Sunny Bhai. Aise hi fodte rahiye 🙂 pic.twitter.com/6H54N9wunF— Virender Sehwag (@virendersehwag) July 10, 2021
स्थानिक क्रिकेटमध्ये अप्रतिम फलंदाजीनंतर 1971 साली वेस्ट इंडीज दौऱ्यावर गावस्कर यांचे भारतीय संघात पदार्पण झाले. पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे गावस्कर खेळू शकले नाही. पण पोर्ट ऑफ स्पेनच्या दुसऱ्या कसोटीत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिल्या सामन्यात 65 आणि नाबाद 67 धावांची खेळी केली. भारताला विजय मिळवून देत त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या फलंदाजीने वेस्ट इंडिज संघाला सळो की पळो केले आणि 4 सामन्यांच्या मालिकेत तीन शतक आणि एक दुहेरी शतक ठोकत 774 धावा केल्या. सलामीच्या मालिकेत इतका मोठा स्कोर करण्याचा गावस्करांचा रेकॉर्ड आजही कोणी तोडू शकलेले नाही. पहिल्या मालिकेतील अप्रतिम कामगिरीनंतर पुढील 17 वर्षे गावस्कर भारताचे सलामीवीर राहिले. त्याकाळात विना हॅल्मेट क्रिकेट खेळले जात आणि अशातही गावस्करांनी न घाबरता अत्यंत खरनाक गोलंदाजाविरुद्ध धावांचे डोंगर उभे केले. त्यामुळेच निवृत्त होताना गावस्करांच्या नावावर अनेक रेकॉर्ड होते. त्यांनी टेस्टमध्ये सर्वाधिक शतकं (34) आणि धावांचा (10122) रेकॉर्ड बनवला. ते जगातील पहिले फलंदाज ठरले ज्यांनी तीन वेळा एका कसोटीतील दोन्ही डावांत शतक ठोकले. 10 हजार टेस्ट रन बनवणारेही ते पहिलेच फलंदाज ठरले. यष्टीरक्षक नसूनही त्यांनी कसोटीत 100 झेल टिपले होते.
हे ही वाचा :
(Virendra Sehwag Wish Happy Birthday Sunil Gavaskar In Diffrent Way Posted Video How Gavskar Reacts Bowlers Who trying to Out them)