Team India: गौतम गंभीरआधी ‘या’ दिग्गजाला मिळाली टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी

| Updated on: Jul 01, 2024 | 6:34 PM

Team India Head Coach: टीम इंडियाच्या हेड कोचबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत माहिती दिली आहे.

Team India: गौतम गंभीरआधी या दिग्गजाला मिळाली टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी
gautam gambhir team india
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला. विजयाच्या 2 दिवसानंतरही साऱ्या भारतात जल्लोषाचं वातावरण आहे. आता टीम इंडिया या वर्ल्ड कप विजयानंतर झिंबाब्वे विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या टी 20 सीरिजसाठी झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. शुबमन गिल हा या मालिकेत झिंबाब्वे विरुद्ध भारतीय संघांचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाच्या या टी 20 मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसह राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतरही बीसीसीआयने नव्या कोचची घोषणा केलेली नाही. झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा हेड कोच असणार, याची चर्चा सुरु होती. मात्र बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

गौतम गंभीर याच्याआधी एका दिग्गजाला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जय शाह यांनी झिंबाब्वे दौऱ्यासाठी कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाची घोषणा केली आहे. जय शाह हे वर्ल्ड कपमुळे बार्बोडस येथे आहेत. तिथे माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. व्हीव्हीएस लक्ष्मण हे विद्यमान एनसीएचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची अधिकृत घोषणा केव्हा होणार? याबाबत जय शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. जय शाह यांनी याचं उत्तर दिलं. “कोच आणि निवड समिती या दोन्ही पदांसाठीच्या प्रमुखांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीने दोन्ही पदांसाठी नाव शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आता मुंबईला गेल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. व्हीव्हीएस लक्ष्मण झिंबाब्वेला जाणार आहेत. मात्र श्रीलंके विरूद्धच्या सीरिजमधून हेड कोच आपल्या कार्यकाळाची सुरुवात करेल”,असं बीसीसीआय सचिव यांनी सांगितलं.

टी 20 सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 6 जुलै दुसरा सामना, 7 जुलै तिसरा सामना, 10 जुलै चौथा सामना, 13 जुलै पाचवा सामना, 14 जुलै.

झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकटेकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर ), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे.