IND vs BAN: Rahul Dravid टीम इंडियातील ‘या’ खेळाडूला देतायत पावर हिटिंगची विशेष ट्रेनिंग

| Updated on: Dec 09, 2022 | 7:47 PM

IND vs BAN: हेड कोच राहुल द्रविड 'या' खेळाडूवर विशेष मेहनत घेतायत, त्यांच्या कोचिंगचा हा खास VIDEO बघा....

IND vs BAN: Rahul Dravid टीम इंडियातील या खेळाडूला देतायत पावर हिटिंगची विशेष ट्रेनिंग
rahul-Dravid
Image Credit source: AFP
Follow us on

ढाका: भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना शनिवारी खेळला जाणार आहे. भारतीय टीमने आधीच ही सीरीज गमावलीय. टीम इंडियाने दोन्ही सामन्यात खराब प्रदर्शन केलं. बांग्लादेशने दोन्ही सामन्यात कठीण परिस्थितीतून कमबॅक करत शानदार विजय मिळवला. टीम इंडिया आता तिसरा वनडे सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. कारण या सीरीजमध्ये बांग्लादेशने क्लीनस्वीप केलं, तर टीम इंडियाला चौफेर टीकेचा सामना करावा लागेल. त्यामुळेच टीम इंडियाने शुक्रवारी जोरदार प्रॅक्टिस केली. हेड कोच राहुल द्रविड यांनी वॉशिंग्टन सुंदरवर विशेष लक्ष दिलं. तो ऑफ स्पिन गोलंदाजी करण्याशिवाय मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो.

न्यूझीलंडमध्ये अर्धशतक

“पुढच्यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपच्यावेळी टीमच्या गरजेनुसार पावर हिटिंग करता यावी, यासाठी सुधारणा करतोय” असं वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या वनडेआधी सांगितलं. फलंदाजी करताना तो टायमिंग आणि प्लेसमेंटसाठी ओळखला जातो. सुंदरने काही वेगवान इनिंग्स खेळल्या आहेत. अलीकडेच त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर आक्रमक अर्धशतक झळकावल होतं.

सुंदरकडे पावरहिटिंगची जबाबदारी

“मागच्या काही वर्षांपासून मला फलंदाजीचा रोल मिळतोय. त्यात खास पद्धतीच्या फलंदाजीची गरज असते. मी त्यानुसारच मेहनत घेतोय. आता ती मेहनत फळाला येतेय” असं वॉशिंग्टन सुंदर मीडियाशी बोलताना म्हणाला. तो म्हणाला की, “मागच्या काही महिन्यात मला माझ्या मेहनतीच फळ मिळालं, याचा आनंद आहे. येणाऱ्या दिवसात चांगलं प्रदर्शन सुरु राहील, अशी अपेक्षा आहे”


सुंदरला वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा

“मागचे सामना माझ्यासाठी एक चांगली संधी होती. पुढचा वर्ल्ड कप लक्षात घेऊन, कुठल्याही परिस्थितीत, संघाच्या गरजेनुसार खेळण्याचा माझा प्रयत्न असेल. संघाला जशी गरज लागेल, तसं मला खेळता आलं पाहिजे, मला अशा पद्धतीचा खेळाडू बनायच आहे” असं वॉशिंग्टन सुंदर म्हणाला. बांग्लादेश विरुद्ध चालू सीरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या आहेत.