कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंकेला अवघ्या 126 धावांवर सर्वबाद करत सामना 38 धावांनी खिशात घातला. कोलंबोच्या के. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवलेल्या या सामन्यातील एका खेळाडूच्या फलंदाजीवर भारताचा कर्णधार शिखर धवन चांगलाच खुश झाला आहे. त्याने त्या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज म्हणत त्याची बॅटिंग पाहायला मजा येते असंही म्हटलं आहे.
हा खेळाडू म्हणजे भारताचा मिस्टर 360 फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. मुंबई इंडियन्सचा लाडका सूर्या आता भारतीय संघही गाजवत आहे. 30 वर्षीय सूर्याने पहिल्या टी-20 मध्ये 34 चेंडूत 50 धावा ठोकल्या आणि चौथ्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसरं अर्धशतक ठोकलं.
धवन सामन्यानंतरच्या प्रेजेंटेशन कार्यक्रमात म्हटला, ”सूर्यकुमार एक महान खेळाडू आहे. आम्हाला सर्वांना त्याची फलंदाजी पाहताना मजा येते. त्याने सामन्यात चांगली फलंदाजी करत माझ्यावरील दबाही कमी केला. त्याचा प्रत्येक शॉट पाहण्यासारखा असतो.”
सूर्यकुमार यादव आता श्रीलंका दौऱ्यानंतर लगेचच इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यावेळी शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे तिघे खेळा़डू दुखापतग्रस्त झाल्याने रिप्लेसमेंट म्हणून सूर्यकुमार आणि पृथ्वी शॉ इंग्लंडला रवाना होणार आहेत.
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनने ही सूर्यकुमारचे कौतुक केले आहेत तो म्हणाला ”मी बऱ्याच वेळापासून सूर्याला खेळताना पाहत आहे. मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना सूर्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून मी त्याला पाहतोय आता तो विराट, रोहितसारखी उत्कृष्ट फलंदाजी करु लागला आहे. तो वेगवान गोलंदासह फिरकीपटूंना अप्रतिम फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात सामिल केलं पाहिजे.”
इतर बातम्या
सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात
(Watching suryakumar yadav batting is amazing feeling says shikhar-dhawan)