IND vs PAK : मोहम्मद रिझवानला पराभवाचा धक्का असह्य, विराट-शुबमनचं नाव घेत म्हणाला, आम्ही जिंकलो….

| Updated on: Feb 24, 2025 | 1:55 AM

India vs Pakistan Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियाविरुद्धचा पराभव पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याला असह्य झालाय. मोहम्मद रिझवानने काय म्हटलं? जाणून घ्या.

IND vs PAK : मोहम्मद रिझवानला पराभवाचा धक्का असह्य, विराट-शुबमनचं नाव घेत म्हणाला, आम्ही जिंकलो....
Mohammad Rizwan IND vs PAK CT 2025
Follow us on

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमची सुरुवात पराभवात झाली. पाहुण्या न्यूझीलंडने ट्राय सीरिजनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. त्यामुळे पाकिस्तानसाठी टीम इंडियाविरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा होता. मात्र टीम इंडियाने बांगलादेशनंतर पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवला. विराट कोहली याने सामन्यातील दुसऱ्या डावात शतक केलं आणि पाकिस्तानला विजयापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. तर पाकिस्तानचं आव्हान हे संपुष्ठात आल्यात जमा आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याला हा पराभवाचा धक्का असह्य झाला. रिझवानने पराभवानंतर काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

मोहम्मद रिझवान याने काय म्हटलं?

पाकिस्ताने पहिल्या डावात ऑलआऊट 241 रन्स केल्या. टीम इंडियाने हे विजयी आव्हान 42.3 ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. रिझवानने यानंतर प्रतिक्रिया दिली. “आम्ही जिंकलो टॉस मात्र आम्हाला त्याचा फायदा मिळाला नाही. आम्ही 280 धावा करु इच्छित होतो. मात्र त्यांच्या (टीम इंडिया) गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगली कामगिरी केली, ज्यामुळे आम्हाला 240 धावांवर ब्रेक लागला”, असं रिझवानने म्हटलं.

“तसेच अबरारने आम्हाला विकेट मिळवून दिली. मात्र शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांनी आम्हाला विजयापासून दूर केलं”, असंही रिझवानने म्हटलं. विराटने टीम इंडियासाठी 7 चौकारांच्या मदतीने 111 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. तर शुबमन गिल याने 46 धावांचं योगदान दिलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.