PAK vs ENG T20 WC Final: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड आज वर्ल्ड कप फायनल होणार नाही?

| Updated on: Nov 13, 2022 | 12:14 PM

PAK vs ENG T20 WC Final: आज नाही मग फायनल मॅच कधी?

PAK vs ENG T20 WC Final: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड आज वर्ल्ड कप फायनल होणार नाही?
Melbourne
Image Credit source: Twitter
Follow us on

मेलबर्न: आज T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना रंगणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन टीम्स फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात फायनलचा सामना खेळला जाणार आहे. आज होणाऱ्या या फायनल मॅचवर पावसाच सावट आहे. मेलबर्नमध्ये आज मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेलबर्नमध्ये आता पाऊस थांबलाय. पण तिथल्या आकाशात काळ्या ढगांची दाटी आहे.

ला निना घटकाचा परिणाम

हवामानातील ला निना घटकाचा आज होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड फायनल मॅचवर मोठा परिणाम होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून नॉन स्टॉप पाऊस कोसळेल. पाऊस कोसळण्याची शक्यता 80 ते 90 टक्के आहे.

ऑस्ट्रेलियन हवामाना विभागाचा हा अंदाज आहे. त्यामुळे कदाचित आज फायनल मॅच होणार नाही. त्याऐवजी उद्या फायनल खेळली जाईल. फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

क्रिकेट चाहत्यांना एकच अपेक्षा

पाकिस्तान आणि इंग्लंडच्या टीम सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये पोहोचल्या आहेत. पाकिस्तानने न्यूझीलंडवर आणि इंग्लंडने भारतावर विजय मिळवला. दोन्ही टीम्सनी एकतर्फी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. निदान फायनल मॅच रंगतदार व्हावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

पावसामुळेच सुपर 12 राऊंडमधील काही सामने रद्द झाले. दोन्ही टीम्सना 1-1 गुण विभागून द्यावा लागला. त्याचा परिणाम सेमीफायनलच्या समीकरणावर झाला. आता याच पावसाची छाया फायनल मॅचवर आहे.